शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुळे एपीएमसीचे उत्पन्न आले निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 00:08 IST

तीन महिन्यांत ९.४४ कोटींचा फटका; अनिश्चिततेसह बंदमुळे परिणाम

- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोनामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत ९ कोटी ४४ लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे. व्यापारामधील अनिश्चितता व कोरोना रोखण्यासाठी मार्केट बंद ठेवावे लागल्यामुळे हा फटका बसला आहे.कोरोनाच्या महामारीमध्येही मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा वाटा आहे. बाजार समिती नसती, तर दीड कोटी नागरिकांना अन्नधान्य पुरविणे शासनास अशक्य झाले असते. अनेक संकटांना सामोरे जाऊन मार्केट सुरू ठेवली असली, तरी या काळात एपीएमसीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. गतवर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत एपीएमसीला १८ कोटी ५६ लाख ९ हजार रुपये उत्पन्न झाले होते. या वर्षी फक्त ९ कोटी ११ लाख रुपयेच उत्पन्न झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९ कोटी ४४ लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे. हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर काही दिवस मार्केट बंद ठेवावे लागले. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या धान्य मार्केटमध्ये एक दिवस आवक व एक दिवस जावक असे नियोजन करावे लागले. यामुळे आठवड्यातून तीन किंवा चार दिवसच मालाची प्रत्यक्ष विक्री केली जात होती. त्यामुळे तेथील उत्पन्न घसरले आहे.मसाला मार्केटमधूनही एपीएमसीला भरपूर उत्पन्न होत होते, परंतु पहिला रुग्ण याच मार्केटमध्ये सापडला व कोरोनामुळे पहिला बळीही याच मार्केटमधील व्यापाºयाचा गेला. परिणामी, येथील व्यवहारावर परिणाम झाला. अनेक व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने माल मागवणे कमी केले. यामुळे येथील उत्पन्न कमी झाले आहे.ऊसाचा हंगाम शून्यावरमुंबई, नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला मोठी मागणी असते. या वर्षी लॉकडाऊनमुळे ऐन उन्हाळ्यात सर्व रसवंतीग्रह बंदहोती. त्यामुळे याचाही फटका बसला आहे. गतवर्षी ऊस मार्केटमधून बाजार समितीला तीन महिन्यांत ५ लाख ९८ हजार महसूल मिळाला होता. या वर्षी एक रुपयाही महसूल मिळाला नाही.शहाळे विक्रीवरही परिणाममुंबई, नवी मुंबई परिसरात शहाळ्याला खूप मागणी आहे. दक्षिणेकडील राज्यातून ओला नारळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. गतवर्षी शहाळे मार्केटमधून एपीएमसीला एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ४६ लाख ४२ रुपये उत्पन्न मिळाले होते. या वर्षी हे उत्पन्न फक्त २ लाख ४६ हजार एवढेच मिळाले आहेखर्चात वाढकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. यामुळे बाजार समितीच्या खर्चात वाढ झाली आहे. भविष्यात उत्पन्न वाढले नाही, तर मार्केटची देखभाल करताना ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती