शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुलुंडमध्ये सिडको उभारणार कोविड हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:41 IST

राज्य सरकारचे निर्देश; अत्यावश्यक सुविधांसह १000 खाटांची क्षमता

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : ठाणे महापालिकेच्या मागणीनुसार राज्य सरकारने १000 खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी दिली आहे. हे हॉस्पिटल उभारण्याची जबाबदारी सिडको महामंडळावर टाकण्यात आली आहे. दरम्यान, सिडकोच्या माध्यमातून मुलुंड येथे १८00 खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने सक्षम उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या शहरात कोविड हॉस्पिटल उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. तसे निर्देश संबंधित प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने सिडकोच्या सहकार्यातून वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १२00 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. तर सिडकोच्या माध्यमातून मुलुंड येथील आर मॉलच्या जवळील २0 एकर जागेवर १८00 खाटांचे कोविड रुग्णालय बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सिडकोवर आता ठाणे शहरात कोविड रुग्णालय उभारण्याची जबाबदारी सोपविली आहे. सोमवारी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सिडको ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात १000 खाटांचे कोविड हॉस्पिटल बांधणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुलुंड येथील रुग्णालयाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.पुढील दोन-तीन दिवसांत हे रुग्णालय राज्य सरकारला सुपुर्द केले जाईल, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात १000 खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबातचे राज्य सरकारचे निर्देश प्राप्त झाले आहेत. महापालिकेकडून जागा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्षात रुग्णालय उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल.- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcidcoसिडको