शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : एटीएम बनताहेत कोरोना संसर्गाची केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:40 IST

नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने एटीएम केंद्रातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. याकडे संबंधित बँकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कळंबोली : कोरोनाच्या काळात पनवेल परिसरातील एटीएम केंद्रातील सुरक्षिततेचा फज्जा उडाला आहे. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरातील मोजके एटीएम सोडले तर बहुतांश एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत, त्याचबरोबर त्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापरही केला जात नाही. नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने एटीएम केंद्रातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. याकडे संबंधित बँकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात स्टेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र , एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, आयडीबीआय यांसारख्या राष्ट्रीयीकृत बँका आणि अर्बन बँक व अन्य खाजगी बँकांची एटीएम केंद्रे आहेत. या एटीएममध्ये एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण काळजी घेतली गेली; परंतु आॅगस्ट महिन्यापासून एटीएम केंद्रे असुरक्षित झाली आहेत. नवीन पनवेल येथील एचडीएफसी चौक, पनवेल रेल्वे स्थानकासमोर, पनवेल उरण नाका, कळंबोली एसबीआय चौक तसेच कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानक रोडवरील बहुतांश एटीएममध्ये सुरक्षारक्षक नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. त्यामुळे इथल्या एटीएममध्ये गर्दी केली जात आहे. त्याचबरोबर सामाजिक अंतरही पाळले जात नाही. बरेच नागरिक मास्कचाही वापर करीत नाहीत. दररोज हजारो ग्राहकांनी एटीएम हाताळल्याने कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित बँक व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.>स्लिपचा कचराकाही ग्राहकांकडून पैसे काढल्यानंतर स्लिप चुरगाळून फेकून दिली जात आहे.या स्लिप अस्ताव्यस्त पडल्याने कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.त्यामुळे एटीएम केंद्रांत अस्वच्छता दिसून येत आहे. तर काही एटीएमवर धूळ साचली आहे.