शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: संकटातून बाजार समिती सावरतेय; निर्बंध झाले शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 23:55 IST

धान्य मार्केटमध्येही प्रतिदिन आवक-जावक सुरू

नवी मुंबई : कोरोनाच्या संकटातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सावरू लागली आहे. व्यापारासाठीचे निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. धान्य मार्केटमध्ये गुरुवारपासून प्रतिदिन आवक-जावक सुरू झाली असून, भाजी मार्केटमधील टोकनपद्धतही लवकरच बंद केली जाणार आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे एप्रिलपासून व्यापारावर विविध निर्बंध लादण्यात आले होते. धान्य मार्केटमध्ये एक दिवस आवक व एक दिवस जावक असे नियोजन करण्यात आले होते. यामुळे आठवड्यातून तीनच दिवस कृषी मालाची प्रत्यक्षात विक्री होत होती. यामुळे देशभरातून माल घेऊन येणाऱ्यांना एक दिवस रखडावे लागत होते. याचा परिणाम व्यवसायावर होऊ लागला होता. प्रशासनाने गुरुवारपासून प्रतिदिन आवक व जावकला परवानगी दिली आहे. भाजीपाला मार्केटमध्येही व्यवसाय करण्यासाठी टोकन पद्धत कार्यान्वित केली आहे. टोकन पद्धतीविषयी नाराजी वाढत असल्यामुळे तीही लवकरच रद्द करण्यात येणार आहे.बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मार्केटमध्ये अँटिजेन चाचण्याही केल्या जात आहेत. व्यापारी, कामगारांमध्येही जनजागृती केली आहे. प्रवेशद्वारावर तापमान व आॅक्सिजन पातळी तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. यापुढे सर्व उपाययोजना करून मार्र्केट सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून धान्य मार्केटमध्ये एक दिवस आवक व एक दिवस जावक असे व्यापाराचे नियोजन केले होते. हे निर्बंध आता उठविण्यात आले असून, यापुढे प्रतिदिन आवक व जावक सुरू राहणार आहे. सर्व मार्केट पूर्ववत सुरू केली जात आहेत.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीगुरुवारी आलेली वाहनेभाजीपाला मार्केट ३२२फळ मार्केट १३२कांदा-बटाटा मार्केट ११५मसाला मार्केट ४८धान्य मार्केट १६७

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती