शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: महानगरपालिकेच्या सेवेत ५१ नवीन डॉक्टर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:48 IST

१४३ स्टाफ नर्सेसचीही नियुक्ती : कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागात भरती

नवी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे. मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे महानगरपालिकेने भरतीप्रक्रिया सुरू केली होती. ५१ डॉक्टर्स, १४३ स्टाफ नर्सेस व ४२ एएनएमची तत्काळ भरती केली असून त्यांना नियुक्तीपत्रही दिले.     नवी मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून त्यांना उपचार मिळवून देताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. मनपाने बंद केलेली कोरोना उपचार केंद्र पुन्हा सुरू केली आहेत. परंतु, या केंद्रांमध्ये डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांची कमतरता भासू लागली होती. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ भरतीप्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी मनपा मुख्यालय व विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये उमेदवारांची कागदपत्र तपासणी व मुलाखती घेण्यात आल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून ५१ डॉक्टर्स, १४३ स्टाफ नर्सेस, ४२ एएनएम यांना नियुक्तीपत्र दिले आहेत.महानगरपालिकेची तात्पुरत्या स्वरूपातील भरतीप्रक्रिया सुरूच राहणार आहे. वैद्यकशास्त्रतज्ज्ञ, मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्ट , एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी मनपाच्या संकेतस्थळावरील लिंकवर अर्ज करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या