शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रात २० कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:31 IST

११ इमारती वगळल्या; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पनवेल : कोविड-१९ चे नव्याने रुग्ण आढळलेल्या इमारती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे. कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी कंटेनमेंट म्हणून घोषित केलेली संपूर्ण इमारत सील केली जाते. नव्याने कोरोना रुग्ण आढळलेल्या पालिका क्षेत्रातील २० इमारती कंटेनमेंट झोन (कोरोनाबाधित क्षेत्र) घोषित करण्यात आलेल्या आहेत.या कंटेनमेंट क्षेत्रात तळोजा येथील घर क्रमांक १३४, तळोजा येथील घर क्रमांक ५०५, कळंबोली सेक्टर ३४ अंचित टॉवर, खारघर सेक्टर ५ अधिराज गार्डन बी विंग, खांदा कॉलनी सेक्टर १० बिल्डिंग नं. १६ पी एल ५, कामोठे सेक्टर ३६ कैलास हाइट्स, कामोठे सेक्टर ६ थारवाणी रेसिडेन्सी, तक्का पामरुची बिल्डिंग बी विंग, रोडपाली सेक्टर १७ अलकनंदा अपार्टमेंट, रोडपाली नवी मुंबई पोलीस मुख्यालय क्वार्टर्स, कळंबोली सेक्टर ११ नील संकुल बिल्डिंग नं. १, खारघर सेक्टर १३ हावरे टीयारा सी विंग, तळोजा फेज १ सेक्टर ११ पायल हाइट्स सोसायटी, कामोठे सेक्टर १८ यश गार्डन सोसायटी, कामोठे सेक्टर १४ यशदीप अपार्टमेट ए विंग, नवीन पनवेल सेक्टर १३ सिडको वसाहत ए टाइप चाळ, जुने पनवेल ओएनजीसी कॉलनी क्वार्टर्स नंबर २४९, रोडपाली सेक्टर १७ एक्सलन्स टॉवर, खारघर सेक्टर ११ अनसुया सोसायटी बी विंग, कळंबोली अग्निशमन अधिकारी क्वार्टर्स आदींना नव्याने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणच्या रहिवाशांनी विशेष काळजी घेत बिल्डिंगच्या लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करण्याचे अवाहन पालिकेच्या मार्फत करण्यात आले आहे. तसेच सोसायटी परिसरात फेरफटका मारताना कुठेही स्पर्श होणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना पालिकेच्या मार्फत करण्यात आलेल्या आहेत.याव्यतिरिक्त कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांनी अलगीकरणाचा ७ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे अशा इमारतींना कोरोनाबाधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. यामध्ये कामोठे सेक्टर ८ मधील शुभम कॉम्प्लेक्स ए विंग, नवीन पनवेल सेक्टर १२ सन स्टोन अपार्टमेंट, कामोठे सेक्टर १०, देवलीला को-आॅ. हाउसिंग सोसायटी बी विंग, नवीन पनवेल सेक्टर ४ पुष्पवर्षा बिल्डिंग, तक्का प्रजापती कॉम्प्लेक्स ए विंग, कामोठे सेक्टर ३५ रिद्धी सिद्धी सोसायटी, कामोठे सेक्टर ८ दीपक को-आॅ. हाउसिंग सोसायटी ए विंग, कामोठे सेक्टर ३४ संस्कृती को-आॅ. हाउसिंग सोसायटी बी विंग, कामोठे सेक्टर ६ श्रीजी अपार्टमेंट ई विंग, कळंबोली सेक्टर ४ अमरदीप सोसायटी ए विंग, कळंबोली सेक्टर १४ रो हाऊस बी-१०२ आदी कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेचे साहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर यांनी माहिती दिली.नियमांचे पालन न केल्यास कारवाईकोरोनाबाधित इमारतीमधील नागरिकांना पालिकेच्या मार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत. पालिकेने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास आपत्ती व्यवस्थापन कलम २००५ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम भारतीय दंड संहितानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या