शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

CoronaVirus News: नवी मुंबई महानगरपालिका वाढविणार व्हेंटिलेटरची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:34 IST

सीएसआर फंडाचाही वापर करणार; राज्य सरकार करणार मदत

- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, महानगरपालिकेने रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतील विशेष रुग्णालयासाठी शासन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार असून, सीएसआर फंडातूनही खरेदी करण्यात येणार आहे.नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या ४,१८९ झाली आहे. यामधील २,४५७ रुग्ण बरे झाले असून, सद्यस्थितीमध्ये १,६0३ जणांवर मनपा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांपैकी हे प्रमाण तीन टक्के आहे. कोरोनामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे. व्हेंटिलेटरची संख्या कमी पडू लागली आहे. आयसीयू विभागात जागा अपुरी पडत आहे. अनेक रुग्णांना आवश्यकता असतानाही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याची तक्रारही होऊ लागली आहे. महानगरपालिकेने वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये १,२00 बेडचे विशेष कोरोना रुग्णालय उभारले आहे. यामुळे सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेसे बेड उपलब्ध झाले आहेत. साहजिकच आता मनपाने व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.वाशीतील विशेष रुग्णालयात ५0 बेड्सचा आयसीयू विभाग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विभागात व्हेंटिलेटर शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सद्यस्थितीमध्ये मनपाकडे २८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. १0 व्हेंटीलेटर्सची लवकरच खरेदी केली जाणार आहे. सीएसआर आणि इतर निधीतून व शासनाकडून जवळपास २0 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यामुळे मनपाकडील युनिटची संख्या ५८ होणार आहे. नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात कोरोनासाठी बेड वाढविण्यात येणार आहेत. तेथेही महानगरपालिका व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार आहे. शहरवासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.नवी मुंबईमधील सद्यस्थिती पुढीलप्रमाणेएकूण चाचणी १५,७३७एकूण पॉझिटिव्ह ४,१८९एकूण निगेटिव्ह १0,९२९कोरोनामुक्त २,४५७मृत्यू १२९होम क्वारंटाईन ९,७९५क्वारंटाईन पूर्ण ३५,१0३महापालिकेने वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये १,२00 बेडचे विशेष कोरोना रुग्णालय उभारले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या