शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: खासगी रुग्णालयातील बिलांवर पालिकेचे नियंत्रण; चार सदस्यीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:26 IST

खासगी रुग्णालयातील शुल्क आकारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी दरपत्रक केलेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का, याच्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.

नवी मुंबई : खासगी रुग्णालयातील मनमानी पद्धतीने बिल आकारण्यावर आता महानगरपालिका नियंत्रण ठेवणार आहे. बिल आकारणीसह महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीकरिता चार सदस्यीय समिती गठीत केली असून, ही समिती आयुक्तांना नियमित अहवाल देणार आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून काही खासगी रुग्णालयांनी मनमानी पद्धतीने बिल आकारणी करण्यास सुरुवात केली. काही रुग्णांना ५ लाखांपेक्षा जास्त बिल आकारल्याचे समोर आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही पैशासाठी आग्रह धरला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. महानगरपालिकेने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात यावे, अशा सूचना देऊनही अनेकांनी नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवले होते. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही खासगी रुग्णालयांच्या मनमानीविषयी आवाज उठविला होता. मनसेने आयुक्तांकडे पाठपुरावा करून तीन रुग्णांचे बिल कमी करण्यास भाग पाडले होते. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनीही याविषयी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना पत्र दिले होते.या सर्वांची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी चार जणांची समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले या समितीच्या अध्यक्षा असणार आहेत. वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनावणे, आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, अधीक्षक उत्तम खरात हे समितीचे सदस्य असणार आहेत.खासगी रुग्णालयातील शुल्क आकारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी दरपत्रक केलेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का, याच्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. शुल्क आकारणी किंवा महात्मा फुले योजनेविषयी तक्रारी असल्यास या समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका