शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: परीक्षार्थींना प्रवासासाठी परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:31 IST

प्रत्येक परीक्षार्थीच्या सोबत एकास प्रवासास परवानगी असेल.

पनवेल : ज्या परीक्षार्थींना स्पर्धा परीक्षा तसेच अन्य परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे, अशा परीक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊनला म्हणजेच शनिवार-रविवार या कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्यास परवानगी असेल. परीक्षार्थ्यांजवळील हॉल तिकीट हा प्रवासासाठीचा वैध पुरावा मानला जाईल. प्रत्येक परीक्षार्थीच्या सोबत एकास प्रवासास परवानगी असेल.आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९चे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश लागू केले आहेत. त्यास अनुसरून काही अतिरिक्त सूचना जाहीर केल्या आहेत.ऑनलाइन अन्नपुरवठा वितरित करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेतील अन्नपुरवठाधारक झोमॅटो, स्विगी आदींना आठवड्यातील सर्व दिवस चोवीस तास सेवा पुरविण्यास परवानगी आहे. याबरोबरच वीकेण्ड लॉकडाऊन दरम्यान हॉटेलमधून नागरिकांना स्वत: जाऊन पार्सल घेण्यास परवानगी असणार नाही. परंतु रेस्टॉरंट किंवा खानावळीमधून पार्सल पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. वीकेण्ड लॉकडाऊनच्या दरम्यान फळविक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री सुरू ठेवता येतील, परंतु केवळ पार्सल सेवा देता येईल. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलजवळ उभे राहून खाता येणार नाही. डोळ्यांचे सर्व दवाखाने आणि त्या अनुषंगाने चष्म्यांची दुकाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कालावधीत सुरू राहतील. हे आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर  कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.