शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: नवी मुंबईसह पनवेलमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:50 IST

निर्बंधांविषयी स्पष्ट माहितीच नाही : संभ्रम कमी करण्यासाठी सायंकाळी जनजागृती

नवी मुंबई/ पनवेल :  कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत ३० एप्रील पर्यंत नवीन निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु निर्बंध सोमवारी रात्रीपासून लागू हाेणार की फक्त शनिवारी, रविवारी असणार याविषयी व्यवसायीक व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.  व्यवसायीक संघटना व सामाजीक, राजकीय कार्यर्तेही याविषयी प्रशासनाकडे दिवसभर विचारणा करत होते. नागरिकांमधील हा संभ्रम दूर करण्यासाठी पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने सायंकाळी  लाऊडस्पीकरवरून प्रत्येक विभागात जनजागृती सुरू केली व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले. शासनाच्या या निर्बंधांची माहिती अद्याप सर्वसामान्य नागरिक, रस्त्यावरील लहान व्यावसायिक आदींना नसल्याने या मिनिलॉकडाऊनबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. विशेषतः रोजंदारीवरील नोकरदार, फेरीवाले, रस्त्यावरील व्यावसायिकांमध्ये याबाबत  कमालीची संभ्रमता निर्माण झालेली आहे.  मागील वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेल्या या लहान व्यावसायिकांचा व्यवसाय काही दिवसांपूर्वीच सुरळीत झाला असताना पुन्हा अशा प्रकारे लॉकडाऊन उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने अनेक जणांवर एक प्रकारे मोठे संकट ओढवले आहे. पुन्हा एकदा निर्बंधांमुळे लहान व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. सोमवारपर्यंतदेखील काय सुरू राहणार आहे आणि काय बंद राहणार आहे, याबाबत अनेकांना काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. नवी मुंबईमध्ये मैदाने, उद्याने पूर्णपणे बंद राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरात नवीन निर्बंधन लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना सोमवारी रात्रीपासून  बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील सर्व उद्याने व मैदानेही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंधाविषयी माहिती देण्यासाठी विभागवाहन पथके तयार करण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या निर्बंधांत सलून पूर्णपणे बंद असल्याचे आम्ही टीव्हीवर बघितले. शासनाचे निर्देश आम्हाला अद्याप थेट प्राप्त झालेले नाहीत. मात्र केवळ सलूनच पूर्णपणे बंद केले जाणार असतील तर आम्ही आमची उपजीविका कशी भागवायची हे शासनाने आम्हाला सांगावे.- पप्पू खामकर, सलून व्यावसायिकशासनाच्या नव्या निर्बंधांबाबत काहीच माहिती नाही. मी रस्त्यावर दररोज वडापावचा व्यवसाय करतो. अनेक जणांनी मला पुन्हा लॉकडाऊन लागले असल्याचे सांगितले. याबाबत स्थानिक प्रशासनाने गोंधळाची परिस्थिती दूर करावी.- गणेश काळेल, वडापाव विक्रेतेठरावीक आस्थापना बंद केल्याने कोरोना थांबणार आहे का? निर्बंध लादून आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.- शैलेश जोशी, व्यापारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या