शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: खाकी वर्दीत दिसला माणुसकीचा झरा; स्थलांतरितांनाही आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 01:14 IST

पाच हजारांहून अधिक गरजूंना अन्नधान्य वाटप

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : लॉकडाउनमुळे रोजगार बुडाल्याने अनेक मजूर, कामगार, घरोघरी जाऊन विक्री करणारे फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा व्यक्तींच्या मदतीसाठी महापालिका, सामाजिक संस्थांबरोबरच पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. महिनाभरात पाच हजारांहून अधिक व्यक्तींना अन्नधान्य वाटप करून खाकी वर्दीनेही माणुसकीचे दर्शन घडवले आहे.कोणीही उपाशी राहू नये म्हणून स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नवी मुंबई पोलीसही एकीकडे कायदा व सुव्यवस्था सांभाळत दुसरीकडे माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. लॉकडाउनमुळे निराधार व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यापर्यंत अन्नधान्याची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. रेल्वे स्थानकांच्या आवारातील भिकारी, दुर्लक्षित झोपडपट्ट्या, निराधार व्यक्ती, मजूर कामगार यांना त्यांच्याकडून अन्नधान्याची मदत दिली जात आहे.दुर्गम भागातील गरजू व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तर ठप्प झालेल्या बांधकामांच्या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांनाही अन्नधान्याची मदत केली जात आहे. त्याशिवाय अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांनाही भेट देऊन आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला जात आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत स्थानिक पातळीवर हे कार्य सुरू आहे. त्यानुसार महिनाभरात पाच हजारांहून अधिक व्यक्तींपर्यंत पोलीस पोहोचले असून त्यांची दोन वेळची भूक भागवली जात आहे. यासाठी काही सामाजिक संस्था व खासगी व्यक्तींचाही हातभार लागत आहे.पोलिसांमार्फत काही ठिकाणी कम्युनिटी किचन चालवले जात आहेत. त्या ठिकाणी शिजवलेले अन्न दोन्ही परिमंडळमधील निराधार व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात आहे. यामुळे कोरोनाच्या भीतीने शहर सोडून निघालेल्यांना आधार मिळाला आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह दोन्ही परिमंडळचे उपायुक्त, विशेष शाखा व मुख्यालयाचे उपायुक्त, वाहतूक शाखेचे उपायुक्त विशेष प्रयत्न करत आहेत. शहरातून कोणीही बाहेर जाऊ नये अथवा बाहेरच्या व्यक्ती शहरात येऊ नयेत याचीही चोख भूमिका पोलीस बजावत आहेत. त्याकरिता शहाराच्या प्रत्येक प्रवेशमार्गावर दिवसरात्र गस्त घातली जात आहे. त्या ठिकाणी मालवाहतूक करणाºया वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली जात आहे. तर ज्यांच्या वास्तव्याचे ठिकाण नाही अशांची वाशी, कळंबोली अथवा पनवेलमधील शेल्टर होममध्ये रवानगी केली जात आहे. तर निराधार व्यक्तींनाही स्थानिक शेल्टर होममध्ये भरती करून त्यांच्याही अन्नपाण्याची सोय करून दिली जात आहे.जेवणाची सोयशहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रमुख जबाबदारी पोलिसांवर आहे. ही भूमिका बजावत गरजू व्यक्तींच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यातदेखील नवी मुंबई पोलीस गुंतले आहेत. खाकी वर्दीतील माणुसकीच्या दर्शनामुळे सर्वत्र कौतुकही होत आहे.