नवी मुंबई : कोरोना संकटात उपचाराच्या नावाखाली खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अशा प्रकारांची गंभीर दखल घेतली असून, रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच शासनाने निश्चित केलेले दर आकारण्याचे आवाहन खाजगी रुग्णालयांना केले आहे.नवी मुंबई शहरात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु नागरिकांमध्ये असलेल्या कोरोनाबाबतच्या भीतीचा गैरफायदा शहरातील खाजगी रुग्णालये घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. उपचार करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक आजाराच्या उपचारासाठी शासनाने दर निश्चित केले असून त्यानुसारच खाजगी रुग्णालयांनी बिले आकारावीत. अन्यथा दोषी आढळणाºया रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त मिसाळ यांनी दिला आहे.
CoronaVirus News: रूग्णालयांना आयुक्तांचा थेट इशारा; कारवाईच संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:47 IST