शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सिडको प्रदर्शन केंद्रात केअर सेंटर; १२०० बेडचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 02:08 IST

नेरूळमधील तेरणामध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचे नियोजन

नवी मुंबई : वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. तेरणा रुग्णालयात १०० बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय व रिलायन्स हेल्थ सेंटरमध्ये ६० बेडचे केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे. वाढती संख्या लक्षात घेता, उपचार मिळवून देण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड रुग्णालय अशा प्रकारे त्रिस्तरीय रुग्णालय व्यवस्था शहरात केली जात आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी, वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या अनुषंगाने पाहणी केली. या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील व उपआयुक्त अमरीश पटनिगिरे उपस्थित होते. प्रदर्शन केंद्रात दोन स्वतंत्र कक्षांत अंदाजे १२०० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामधील एका कक्षात स्वॅब सॅम्पल टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या व सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविड-१९ बाधितांवर स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत. दुसऱ्या कक्षात कोरोना पॉझिटिव्ह नागरिकाच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाइन केलेल्या संशयित नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी आवश्यक असलेल्या स्नानगृहे व स्वच्छतागृहांची व्यवस्था मॉड्युलर स्वरूपात त्वरित तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.

घणसोलीतील रिलायन्स कॉर्पोरेट आय.टी. पार्कमध्ये मेडिकल अ‍ॅण्ड आॅक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये कोविड केअर सेंटरकरिता १२० बेड्स असणार असून त्यामधील ६० बेड्स महापालिका कोरोनासंदर्भित व्यक्तींसाठी राखीव असतील. येथे महापालिकेमार्फत कामकाज नियंत्रणासाठी नोडल आॅफिसर म्हणून डॉ. वरुण घिलडियाल यांची नियुक्ती केली आहे. सद्य:स्थितीत वाशी सार्वजनिक रुग्णालयात १३० बेड्सचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय कार्यान्वित असून नेरूळ येथील तेरणा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात १०० बेड्सचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी कामकाज नियंत्रणासाठी नोडल आॅफिसर म्हणून डॉ. रुषिभा जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड-१९ नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींवर योग्य उपचार व्हावेत व कोणताही रुग्ण वैद्यकीय उपचारांशिवाय राहू नये याकरिता वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतले जात आहेत. नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे व घरातच थांबून सहकार्य करावे. - अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस