शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पाच दिवसांमध्ये १५७५ वाहने जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 23:36 IST

पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे गांभीर्य नागरिकांकडून घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन लावलेला असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार बुधवारी ३ हजार ९०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पाच दिवसांत तब्बल १५७५ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे गांभीर्य नागरिकांकडून घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनदरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात (परिमंडळ १) २२ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्या ठिकाणी बुधवारी ३ हजार ९०० कारवाया करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कारवाईचा धडाका सुरू असतानाही नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारी १,५५४ जणांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तर ३९९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. शिवाय मास्कचा वापर न करणाºया ४६ जणांवर, सामाजिक अंतर न राखणाºया ८६ जणांवर तर महामारी कायद्यांतर्गत २०९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.परिमंडळ १चे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सलग पाचव्या दिवशीही कारवाया सुरू आहेत. या पाच दिवसांत पोलिसांनी तब्बल १ हजार ५७५ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने विनाकारण एका विभागातून दुस-या विभागात फिरताना आढळल्या व्यक्तींची आहेत. तर पालिकेने दिलेल्या वेळेत व्यवसाय बंद न करणाºया सात जणांवर गुन्हे दाखल केलेआहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई