शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात सलग १०० दिवस धावण्याचा संकल्प पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:29 IST

बाळासाहेब झंजे यांचा विक्रम; २७ जून ते ४ ऑक्टोबरदरम्यान दररोज १० किमी अंतर केले पार

पनवेल : कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थिती सलग १०० दिवस धावून महाड आद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झंजे यांनी अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून दररोज ७ ते १० किमीचे अंतर गाठत असत. दि.२७ जून ते ४ आॅक्टोबरदरम्यान झंजे यांनी आपला १०० दिवस धावण्याचा विक्रम पूर्ण केला.नवीन पनवेलमधील गुड मॉर्निंग रनर ग्रुपचे सदस्य आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी दररोज व्यायाम, योगा करत असतात. त्यातूनच झंजे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी सलग १०० दिवस सलग धावण्याचा संकल्प केला. या संकल्पात ग्रुपचे सदस्य व पोलीस दलातील सेवेत असलेले चांगदेव भोसले, रवी कुमार, जयेश टेंबे, माधव भाहेकर हेही सहभागी झाले. या संकल्पादरम्यान सर्वांनी आपले ध्येय साध्य करत असताना, विविध पर्यटन ठिकाणे, गड-किल्ले आदींना भेट दिली. यामध्ये आंबेनळी घाट, मोरबे धरण, प्रतापगड, रायगड आदींसह रायगड-पनवेल परिसरातील पर्यटन ठिकाणांचा समावेश आहे. रविवारी पनवेलमधील पुष्पकनगर या ठिकाणी सुमारे २१ किमीचे अंतर गाठत आपला १०० दिवसांचा संकल्प पूर्ण केला. या काळात सुमारे ७५० किमीपेक्षा जास्त अंतर सर्वांनी गाठले. मागील वर्षी अशाच प्रकारचा संकल्प गुड मॉर्निंग रनर ग्रुपच्या या सदस्यांनी पूर्ण केला.शासकीय कामात कोणताही व्यत्यय न आणता, मी व माझ्या साथीदारांनी आम्ही स्वत: ठरविलेला संकल्प पूर्ण केला. चांगले आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रत्येकाने अशा प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास, प्रत्येक जण सुदृढ बनेल. कोरोनासारख्या संकटात आपल्याला आपले स्वास्थ्य निरोगी राखता येईल. याकरिता प्रत्येकाने अशा प्रकारे संकल्प स्वीकारणे गरजेचे आहे- बाळासाहेब झंजे