शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

भाकरीच्या गृहोद्योगावर कोरोनाचे सावट; बचतगटांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 01:02 IST

शहरी, ग्रामीण भागातील ४ ते ५ हजार गृहिणींवर उपासमारीची वेळ

- अनंत पाटील नवी मुंबई : पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या भाकरी मातीच्या चुलीवर आणि मशीनवर बनविल्या जातात. अनेक महिलांचे आर्थिक गणित या भाकरीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र लॉकडाउनमुळे भाकरी तयार करणाºया गृहउद्योगांवर अवलंबून असणाºया ठाणे, रायगड, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील २५ ते ३० बचतगटांना फार मोठा फटका बसला आहे. जवळपास ४ ते ५ हजार महिलांवर उदरनिर्वाहाचे संकट ओढावले आहे.

तांदळाची भाकरी आणि रस्सा भाजीचा बेत जमून आल्यास त्याची अवीट गोडी चाखण्यासाठी खवय्यांची नेहमीच झुंबड उडते. या भाकºया लाकडाच्या चुलीवर, गॅसवर तयार केल्या जातात. ठाणे, रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतील किनारपट्टीवरील आगरी-कोळी समाजाप्रमाणे इतर लोकांच्या रोजच्या आहारात आवर्जून भाकरीचा समावेश केला जातो. मोठमोठे हॉटेल्स, ढाबे तसेच पोळीभाजी केंद्रांप्रमाणे खास तांदळाच्या भाकरीची केंद्र सुरू करण्यात आल्याने अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे.

बचत गटांनाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. एकट्या नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा परिसरात ४०० ते ५०० महिला चुलीवर तर काही मशीनवर भाकरी बनवून आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. मात्र लॉकडाउनमुळे भाकरीचा गृहोद्योग ठप्प झाल्याने उपजीविकेवर परिणाम झाला आहे.

ठाणे, मुंबई, रायगड आणि नवी मुंबईत आगरी कोळी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांचे सण-उत्सव, साखरपुडा, हळदी समारंभ आणि लग्न कार्यात शेकडोच्या संख्येने तांदळाच्या भाकरीची आॅर्डर दिली जाते. मात्र कोरोनामुळे सर्व आॅर्डर रद्द झाल्याने महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

एका लग्नासाठी कमीतकमी ५०० ते जास्तीतजास्त ४ हजार भाकऱ्यांची विक्री होते. मात्र कोरोनामुळे संचारबंदीत गर्दी टाळण्यासाठी इतर व्यवसायांप्रमाणे गृहोद्योग म्हणून ओळख मिळविलेल्या भाकरी उद्योगावरहीसंकट ओढावले आहे.- सुनीता ठाकूर, अध्यक्षा, ज्ञानाई महिला मंडळ, कोपरीगाव, नवी मुंबई.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई