शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कचराकुंडीत फेकला कोरोनाचा जैविक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:16 IST

नवी मुंबईमधील प्रकार : निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नवी मुंबई : महानगरपालिका व काही खासगी रुग्णालयातील कोरोनाचा जैविक कचरा ही कचराकुंडीत टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपाने ठेकेदाराला वाढीव मुदत न दिल्याने कचरा उचलला जात नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे, परंतु मनपातील काही अधिकारी व कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळे आयुक्तांच्या उपाययोजनांवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. मनपाच्या व काही खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कचरा घनकचरा वाहून नेणाºया कचराकुंडीत टाकला जात आहे, तसेच मागील काही दिवसांपासून कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वाशी, नेरुळमध्ये रुग्णालय व कोविड केअर सेंटरबाहेर चार ते पाच दिवस कचरा पडून रहात असल्याचेही निदर्शनास आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वैद्यकीय कचरा वाहून नेण्याचा ठेका दिला आहे. या ठेक्याची मुदत संपली असून, संबंधितांना अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नाही. यामुळे कचरा वेळेत उचलला जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. आयुक्त अभिजीत बांगर यांनी तत्काळ हा प्रश्न सोडवावा. याला जबाबदार असणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.‘लोकमत’ने उठविला आवाजच्पीपीई किट व कोविड रुग्णालयातील कचरा रोडवर व कचराकुंडीत टाकला जात असल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वीही दोन वेळा निदर्शनास आणून दिले होते. सानपाडा व सायन-पनवेल महामार्गावरील वैद्यकीय कचºयाविषयी छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित केले होते.कोविड रुग्णालयातील कचरा घनकचरा घेऊन जाणाºया कुंड्यांमध्ये टाकला जात आहे. हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.- दिव्या गायकवाड,माजी आरोग्य समिती सभापती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगड