शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वाशी आरटीओ कार्यालयातील गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:15 IST

अधिकारी-कर्मचारी धास्तावले : सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून एकावेळी केवळ एकालाच प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याची खबरदारी घेतली जात असली, तरी वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) गर्दी हटत नसल्याचे चित्र सोमवारी सकाळी पाहावयास मिळाले.  शिकाऊ परवाना, फिटनेस, ब्रेक टेस्टिंगसाठी आधीच अपॉइंटमेंट घेतल्यामुळे नागरिक दररोज आरटीओ कार्यालयात हजेरी लावत आहेत. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचारी धास्तावले असून, सोमवारी दुपारपासून मात्र सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून एकावेळी केवळ एकालाच प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.वाशी आरटीओ  कार्यालयात एकूण ३६ खिडक्यांची सुविधा आहे. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी दररोज साधारण १२० जणांना अपॉइंटमेंट दिली जाते. ही परीक्षा बुडाल्यास नागरिकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ‘सरकारी काम वर्षभर थांब’ असा वाईट अनुभव आल्याची माहिती घणसोली गावचे रमेश कृ. म्हात्रे यांनी दिली. ‘कोरोना’ची भीती असूनही नागरिक ‘आरटीओ’त येत आहेत. ‘फिटनेस’ सर्टिफिकेटसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. सरकारच्या नियमावलीनुसार इमारतीच्या प्रवेशद्वारातून प्रत्येक वेळेला केवळ पाचजणांना प्रवेश दिला जात आहे. नागरिकांनी अपॉइंटमेंट घेतली असल्याने त्यांना आरटीओत येऊ नये असे अधिकारी किंवा कर्मचारी सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना खबरदारीच्या  सूचना करण्यात आल्या असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.