शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, मलेरिया साथ नियंत्रणात

By admin | Updated: November 18, 2015 01:21 IST

शहरात सुरू झालेली डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणामध्ये येवू लागली आहे. पालिकेने आॅगस्टपासून तब्बल ३ लाख ३४ हजार घरांना भेट देवून ५ लाख डासउत्पत्ती स्थळे शोधून

नवी मुंबई : शहरात सुरू झालेली डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणामध्ये येवू लागली आहे. पालिकेने आॅगस्टपासून तब्बल ३ लाख ३४ हजार घरांना भेट देवून ५ लाख डासउत्पत्ती स्थळे शोधून काढली आहेत. जानेवारीपासून तब्बल १ लाख ४२ हजार रूग्णांची रक्ततपासणी केली आहे. व्यापक जनजागृती मोहीम व केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील तापाची साथ नियंत्रणात येवून शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू व मलेरियाची प्रचंड साथ सुरू झाली होती. तापाच्या साथीमुळे शहरातील सर्व रूग्णालये फुल्ल झाली होती. तापामुळे २५ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाविषयीही नाराजी निर्माण झाली होती. पालिकेने विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. पालिकेने एप्रिल व मे महिन्यामध्ये शहरातील २ लाख ८६ हजार घरांची पाहणी केली होती. आॅगस्टमध्ये पुन्हा ३ लाख ३४ हजार घरांची पाहणी करून ५ लाख २८ हजार डासउत्पत्तीस्थळे शोधून काढली होती. यामधील ३४८ ठिकाणी एनफिलीस, १०३८ ठिकाणी एडीस व २२ क्युलेक्स डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे पालिका प्रशासनाने जून महिन्यापासून शहरात २ लाख भित्तीपत्रके गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लावली आहेत. १ लाख ७५ हजार हस्तपत्रकांचे वाटप केले आहे. शहरात तब्बल ९२ शिबिरे व प्रदर्शनांचे आयोजन केले होते. शहरात १३५ मोठे होर्डिंग उभारण्यात आले. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचता यावे यासाठी १० हजार थ्री फोल्ड बुकलेट, २० हजार स्टीकर्स वाटण्यात आली. महापालिका प्रशासनाने साथ नियंत्रणात आणण्यासाठी लिंक वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या ५२ प्रशिक्षण सभा घेतल्या होत्या. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या, सामाजिक संस्थांच्या २२० सभा घेवून जनजागृती करण्यात आली. शहरात ६८१४ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे आहेत. ८५० ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये जानेवारीपासून तापाचे १ लाख ४२ हजार रूग्ण आढळून आले आहेत. यामधील १००६ संशयित डेंग्यूचे रूग्ण आहेत. एनएस१ चे ८५९, एलजीएमचे ७३ रूग्ण आढळून आले आहेत. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांनीही शहरात तापाची साथ नियंत्रणात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.