शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या दुसऱ्या यादीतील प्रवेशाला मुदतवाढ, तिसरी यादीही पुढे ढकलली

By admin | Updated: July 8, 2016 20:00 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८ : अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारीही महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. दरम्यान, या मुदतवाढीमुळे अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारऐवजी मंगळवारी जाहीर होणार आहे.

सहाय्यक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी, ४ जुलैला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यास वेळ दिलेला होता. तर बुधवारी रमजान ईदनिमित्त महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. मात्र काही महाविद्यालयांत दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारनिमित्त सुट्ट्या देण्यात आल्या.

परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस कमी मिळाला होता. याची दखल घेत, उपसंचालक कार्यालयाने प्रवेशासाठी शनिवारी एक दिवस वाढीव दिलेला आहे. दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यांपैकी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २७ हजार ३१० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले होते. त्यामुळे अकरावीला आत्तापर्यंत एकूण १लाख २१ हजार १०१ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केले आहेत. याशिवाय १५ हजार ६५२ विद्यार्थी तिसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता मुंबई महानगर क्षेत्रातील हजारो जागा रिक्त राहण्याची भीती आहे.