शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता साहाय्यक पोलीस आयुक्तांशी झाला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:42 IST

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या साहाय्यक आयुक्त राजकुमार चाफेकर यांच्याशी अखेर संपर्क झाला आहे. रविवारी सकाळी त्यांनी मध्य प्रदेश येथून पोलीस कंट्रोल रूमवर संपर्क साधून सुखरूप असल्याची माहिती दिली.

नवी मुंबई : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या साहाय्यक आयुक्त राजकुमार चाफेकर यांच्याशी अखेर संपर्क झाला आहे. रविवारी सकाळी त्यांनी मध्य प्रदेश येथून पोलीस कंट्रोल रूमवर संपर्क साधून सुखरूप असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण स्पष्ट नसून, मनस्तापातून घर सोडल्याची शक्यता वर्तविली जात आहे.गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे साहाय्यक आयुक्त राजकुमार चाफेकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. शुक्रवारी रात्री ते घरी काही न सांगता, अज्ञात ठिकाणी निघून गेले होते. या वेळी त्यांनी मोबाइल फोनदेखील घरीच ठेवला होता. यामुळे दोन दिवस त्यांच्याशी कोणाचा संपर्क होऊ शकला नव्हता. कार्यालयातदेखील त्यांच्याविषयी कोणाला काहीच माहीत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर शनिवारी रात्री चाफेकर यांंच्या मुलाने ते हरवल्याची तक्रार एनआरआय पोलिसांकडे केली होती. त्यानुसार, नवी मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत होते. याचदरम्यान, रविवारी सकाळी चाफेकर यांनी स्वत: नवी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमवर संपर्क साधून, आपण मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक त्यांना घेऊन येण्यासाठी रवाना झाल्याचे समजते. मात्र, चाफेकर यांनी अचानक घर सोडून निघून जाण्यामागचे कारण समोर आलेले नाही, परंतु काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, असे समजते. चाफेकर यांनी पोलीस निरीक्षक असताना, वाशी व नेरूळ पोलीस ठाण्यात काम केले आहे. साहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाल्यानंतर, त्यांची आयुक्तालयाबाहेर बदली झाली होती. वर्षभरापासून ते नवी मुंबई आयुक्तालयात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आहेत.