शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भाजीपाला, फळांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ; APMC बाजारात बराच भाजीपाला सडला...

By नामदेव मोरे | Updated: August 20, 2025 12:25 IST

भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची ओढवली नामुष्की

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुसळधार पावसाचा फटका कृषी व्यापारासही बसला आहे. मंगळवारी भाजीपाला, फळ मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. यामुळे जवळपास २५ टक्के भाजीपाल्याची विक्रीच झाली नाही. भिजल्यामुळे ५० टनपेक्षा जास्त मालाचे नुकसान झाले आहे. ग्राहक नसल्यामुळे बाजारभावही घसरले असून, किरकोळ मार्केटमध्येही दर नियंत्रणात आले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी ४९० ट्रक  टेम्पोमधून १७९२ टन  भाजीपाला विक्रीसाठी आला होता. तीन दिवसांपासून मंदी असल्यामुळे आवकही कमी झाली. गरजेपेक्षा कमी आवक होऊनही जवळपास ४५० ते  ५०० टन भाजीपाल्याची विक्री झाली नाही. भिजल्यामुळे कोथिंबीर, टोमॅटोसह इतर पालेभाज्या सडण्याचे प्रमाण वाढले आहे. 

धान्य मार्केटवरही परिणाम

फळमार्केटमध्येही ग्राहकांनी पाठ फिरविली होती; परंतु या ठिकाणी भाजीपाल्याच्या तुलनेमध्ये माल जास्त खराब झाला नाही. कांदा, बटाटा, धान्य व मसाला मार्केटमध्येही ग्राहकांचे प्रमाण कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

कांदा, बटाटा, लसूण मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या कमी होती. दिगंबर राऊत, कांदा व्यापारीभाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाली होती; परंतु ग्राहकच नसल्यामुळे माल शिल्लक राहिला आहे. शंकर पिंगळे, संचालक, भाजीमार्केट फळमार्केटमध्ये २५ टक्केही व्यापार झाला नाही. मुंबईतील पावसाचा परिणाम विक्रीवर झाला आहे. संजय पानसरे, संचालक, फळमार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई