शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधितांचे पुनर्वसित भूखंडावर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:16 IST

विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे.

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. या पैकी २१२ प्रकल्पबाधितांना सदर भूखंडांवर बांधकाम सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत दोन प्रकल्पबाधितांना भोगवटा प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे.सिडकोने विमानतळाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. पुनर्वसित ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यासाठीची प्रक्रिया सुलभ केली आहे. बांधकाम परवान्याची प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी प्रकल्पबाधितांना सदर प्रक्रिया व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी सिडको महामंडळातर्फे बांधकाम परवानगी मिळवताना कोणकोणती खबरदारी घ्यावी व त्याचप्रमाणे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या विषयीची माहिती विमानतळ प्रकल्पबाधित गावांमध्ये लवकरच वितरित केली जाणार आहे. यामुळे बांधकाम परवान्याची प्रक्रि या सहजपणे करता येणार आहे. प्रकल्पबाधितांनी त्यांना प्राप्त झालेल्या भूखंडांवर ज्या प्रमाणात बांधकाम करायला सुरुवात केली आहे, त्यावरून हे एक सर्व सोयी सुविधांनी युक्त, नियोजनबद्ध व स्वयंपूर्ण असे नगर निर्माण होणार यात शंका नाही. त्याचबरोबर विमानतळ प्रकल्पाचे कामदेखील वेगाने सुरू असून, सभोवतालच्या परिसराचा कायापालट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पाला जेव्हा मूर्त स्वरूप प्राप्त होईल, तेव्हा तर सभोवतालच्या परिसरासोबतच प्रकल्पबाधितांच्या या नगरालादेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होईल.बांधकामांसाठी प्रकल्पबाधितांना १००० रुपये प्रति चौ. फूट बांधकाम अनुदान दिले जात आहे. याशिवाय दिनांक ७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत घरे निष्कासित केल्यास प्रकल्पबाधितांना ५०० रुपये प्रति चौरस फूट प्रोत्साहन अनुदान व १८ महिन्यांचे घरभाडे देण्यात येत आहे. सर्व विमानतळ प्रकल्पबाधितांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनीही या असामान्य नगराची रचना करण्यासाठी लवकरात लवकर आपल्या पुनर्वसनापोटी देय असलेल्या भूखंडाचा ताबा घेऊन बांधकाम परवानगीसाठीची प्रक्रि या सुरू करावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.