शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल प्रशासकीय भवनचे काम रखडले

By admin | Updated: June 28, 2015 01:20 IST

शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावी, या उद्देशाने शहरात प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. येथील पाया उभारणीचे काम पूर्ण झाले असले तरी बाजूलाच असलेल्या बचत

प्रशांत शेडगे , पनवेलशासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावी, या उद्देशाने शहरात प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. येथील पाया उभारणीचे काम पूर्ण झाले असले तरी बाजूलाच असलेल्या बचत भवनामुळे प्रशासकीय भवनाचे पुढील काम रखडले आहे. येथील गाळेधारकांनी प्रशासकीय भवनात पर्यायी जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी करीत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत गाळे न तोडण्याचे आदेश दिले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याच्या बाजूला पनवेल तहसील, कोषागार, वन विभाग, निबंधक अणि पोलीस ठाणे ही कार्यालये होती. जुन्या इमारती जमीनदोस्त करून सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा प्रस्ताव पुढे आला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरीही मिळाली. त्यानुसार तहसील कार्यालय, कोषागार कार्यालय महसूल प्रबोधनीत हलविण्यात आले, त्याचबरोबर पोलीस ठाणेही या ठिकाणी नेण्यात आले आहे. जितकी जागा घेता तितकीच जागा आम्हाला मिळाली पाहिजे, या मुद्द्यावर नवी मुंबई पोलीस अडून बसले होते. त्यानुसार आराखड्यात बदल करण्यात आला, तसेच तत्कालीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी पुढाकार घेऊन पोलीस ठाणे महसूल प्रबोधनीत हलवले. परिणामी, प्रशासकीय भवनाचा मार्ग मोकळा झाला आणि जुन्या इमारती जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला या ठिकाणी पायलिंग करण्याचे ठरले होते. मात्र या ठिकाणी बोल्डर लागल्याने पायलिंगऐवजी साडेतीन मीटर पाया खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि तळघरातील जागा स्टील पार्किंगसाठी ठेवण्याचा निर्णय झाला. त्यातही निम्मी जागा पोलीस ठाण्याला तर उर्वरित जागी पार्किंग करण्यावरून वादंग झाला. सातत्याने प्रशासकीय भवनाचा आराखडा बदलावा लागल्याने त्यास विलंब झाला. तब्बल दहा वर्षे रखडलेल्या या भवनाचे काम आताकुठे सुरू होत होते, तर बाजूला असलेल्या बचत भवनाने पुन्हा खो घातला. या इमारतीत तीन व्यावसायिक शासकीय दरानुसार भाडे अदा करून गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. या भाडेकरूंनी प्रशासकीय भवनात जागा मिळावे यासाठी न्यायालयात दावा केला आहे. त्यामुळे भवनाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.बचत भवनमधील गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रशासकीय भवनाला अडथळा ठरत असल्याने आमची चर्चा सुरू आहे. त्यांना शासनमान्य दराने भाडेतत्त्वावर जागा दिल्यास दिवाणी न्यायालयातील दावा ते काढून घेण्यास तयार आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार सुरू असून लवकरच तोडगा काढून काम मार्गी लागेल. -दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल