शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल क्षेत्रातील विकासकांना दिलासा

By admin | Updated: March 31, 2017 06:40 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील भूखंडांवरील अतिरिक्त भाडेपट्टा अधिमूल्य सहा महिन्यांसाठी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण

नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रातील भूखंडांवरील अतिरिक्त भाडेपट्टा अधिमूल्य सहा महिन्यांसाठी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील विकासकांना मोठा दिलासा मिळाला आहे.पनवेल महापालिकेच्या स्थापनेपूर्वी कळंबोली, कामोठे व नवीन पनवेल या नोडमध्ये सिडकोच्या माध्यमातून बांधकाम परवानगी दिली जात असे. ही परवानगी देताना चार वर्षांत बांधकाम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र घेण्याची अट होती. या कालावधीत भोगवटा प्रमाणपत्र न घेणाऱ्या विकासकांकडून अतिरिक्त भाडेपट्टा अधिमूल्य अर्थात दंड आकारला जात असे; परंतु पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबर २0१६ रोजी स्थापना झाली. त्यानंतर बांधकाम परवानगीविषयक सर्व नस्ती व कागदपत्रे सिडकोने महापालिकेकडे हस्तांतरित केली. महापालिकेच्या स्थापनेपासून १४ एप्रिल २0१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत ज्या भूखंडधारकांच्या भूखंडाचा मूळ व वाढीव बांधकाम कालावधी संपुष्टात येत आहे, तसेच या कालावधीत ज्यांनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केले आहेत किंवा नाही, अशा सर्व भूखंडधारकांना पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कोणताही दंड अर्थात अतिरिक्त भाडेपट्टा अधिमूल्य न आकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल क्षेत्रात सिडकोने मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप केले आहे. सिडकोने वाटप केलेल्या भूखंडांवर चार वर्षांच्या आत बांधकाम करणे अनिवार्य असते. या नियमांचे उल्लंघन झाल्यास वाढीव भाडेपट्टा अधिमूल्य अर्थात दंडाची आकारणी केली जाते. पनवेल महापालिकेची स्थापनेच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील विकासकांनी दंडाची रक्कम माफ करावी, यासाठी सिडकोकडे विनंती केली होती. त्यानुसार संचालक मंडळाने यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पुढील सहा महिने या क्षेत्रातील भूखंडधारकांकडून अतिरिक्त भाडेपट्टा अधिमूल्य माफ करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)