शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नैना क्षेत्रातही युडीसीपीआर लागू करण्याचा विचार; उदय सामंत यांची माहिती

By कमलाकर कांबळे | Updated: February 12, 2024 17:06 IST

सिडकोच्या नैना परिक्षेत्रातील गावांना एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि संवर्धन विनियमन (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री  तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  दिले आहे. 

नवी मुंबई:  सिडकोच्या नैना परिक्षेत्रातील गावांना एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि संवर्धन विनियमन (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री  तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  दिले आहे.  कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस आमदार महेश बालदी,  आमदार प्रशांत ठाकूर,  आमदार बाळाराम पाटील यांच्यासह जे. एम.म्हात्रे, बबन पाटील, रामदास शेवाळे, अरुणशेठ भगत तसेच संबंधित शासकीय अधिकारी  उपस्थित होते. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरीता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्रात पनवेल, उरण व पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश आहे. त्यापैकी  अधिसूचित क्षेत्रामध्ये 23 गावांचा अंतरीम प्रारुप विकास आराखडा   शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित 152 गावांचा प्रारुप विकास योजना 16 सप्टेंबर,2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे. त्यामुळे नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील,  असेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या  विविध प्रश्नांबाबत चर्चा

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित कोकण भवन येथे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाच्या विविध प्रश्नांबाबत खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळाच्या हात कागद संस्था,पुणे यासाठी 1 कोटी रुपये आणि खादी भवनाच्या इमारत दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये अनुदान देण्याला सामंत यांनी तत्वत: मान्यता दिली. विश्वकर्मा योजना ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करणार असल्याचे त्यांनी  सांगितले. यंदा महाबळेश्वर परिसरात ‘कारवी’ मध उपलब्ध होणार असून या मधाच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र योजना करण्यावरही विचार करण्यात आला. खादीग्रामोद्योग मंडळाची रिक्त पदे भरणे, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध उत्पादनाची विक्री आणि त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा मॉल याबाबत सकारात्मक चर्चा झाली.