शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील ऐतिहासिक तोफांचे होणार संवर्धन; महापालिका करणार अडीच ते तीन लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 00:41 IST

पनवेल नगरपरिषदेचे पालिकेत रूपांतर झाले. यालाही तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या दरम्यान तोफा अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे.

वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिका मुख्यालयासमोरील शिवकालीन ऐतिहासिक तोफा अडगळीत पडल्याचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. महापालिका प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत, तोफांचे जतन करून शास्त्रोक्तरीत्या संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. एका संस्थेला हे काम देण्यात आले आहे.

२०१० मध्ये पनवेल बंदरात उत्खनादरम्यान आठ शिवकालीन तोफा सापडल्या होत्या. २०११ मध्ये संबंधित तोफांना चंदेरी रंग देऊन त्या पनवेल नगरपरिषद मुख्यालयासमोर, एक चौथरा बांधून दर्शनीय भागात ठेवण्यात आल्या होत्या.

पनवेल नगरपरिषदेचे पालिकेत रूपांतर झाले. यालाही तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या दरम्यान तोफा अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे पनवेल पालिका मुख्यालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना तोफांच्या संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे अभ्यासक असलेले अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी, तोफांच्या संवर्धनाचा प्रस्ताव तयार केला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तोफा पुनर्जीवित करण्याचे काम श्री शिव सह्याद्री संस्थेला देण्यात आले आहे. तोफांमध्ये केलेली रंगरंगोटी पूर्णपणे काढून त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. नगरपरिषद अस्तित्वात असताना चंदेरी रंगाच्या आॅइल पेंटने तोफांची रंगरंगोटी करण्यात आली होती.

या वेळी तोफांमधील दारूगोळा पेटविण्याची छिद्र या रंगरंगोटीत नाहीसे झाले. या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून या तोफांचे पुनर्जीवित करण्यात येणार आहे, याकरिता सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च पालिका उचलणार आहे.

पनवेल महापालिकेतील मुख्यालयातील ऐतिहासिक तोफांचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या संवर्धनाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तोफा आपल्या मूळ स्वरूपात सर्वांना पाहावयास मिळणार आहेत. - डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिकास्वराज्यात पनवेल प्रांताचे महत्त्व

  • पनवेल बंदरातून परदेशात मालाची वाहतूक होत असल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात.
  • शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी लुटले, तेव्हा पनवेल प्रांतदेखील स्वराज्याचा घटक बनला.
  • शिवाजी महाराजांच्या कार्यकालात पनवेलचे दाखले वेळोवेळी देण्यात आले आहेत.
  • शिवकाळात पनवेलच्या बंदराच्या संरक्षणासाठी या तोफा धक्क्यावर लावण्यात आल्याने या तोफांना ऐतिहासिक महत्त्व असल्याचे शिवप्रेमी व इतिहासाचे अभ्यासक सागर मुंडे यांनी सांगितले.
  • तोफा पुनर्जीवित करण्याचे काम श्री शिव सह्याद्री संस्थेला देण्यात आले आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी प्रस्ताव तयार केला असून अडीच ते तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगड