नवी मुंबई : खारघरमध्ये सुरु असलेल्या संत समागमाला विविध राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. या समागमात भाविकांना मार्गदर्शन करताना ईश्वराशी नाते जोडून जगाला एक परिवार बनविणे शक्य असल्याचा संदेश माता सविंदर हरदेवजी यांनी दिला. खारघर येथे आयोजित हा संत समागम महाराष्ट्रातील सर्वात मोठा समागम असून या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य केले जात आहे.धर्म, जात, संस्कृती, भाषा आणि राष्ट्रीयता यांच्या नावाखाली मनुष्याचे विभाजित झाल्याचे माता हरदेवजी यांनी स्पष्ट केले. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी दिलेल्या एकता आणि भिंतविरहित जगाच्या शिकवणीची आठवण यावेळी करून देण्यात आली आहे. सत्संगाच्या कार्यक्रमात विविध वक्ते, कवी व गीतकार यांनी वेगवेगळ््या भाषांमध्ये भाव व्यक्त करत कलेच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला. (प्रतिनिधी)
ईश्वराशी नाते जोडा, जग आपोआप एक परिवार बनेल
By admin | Updated: January 30, 2017 02:16 IST