शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

By admin | Updated: November 17, 2016 05:32 IST

वेळेवर वैद्यकीय उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो.

गिरीश गोरेगावकर

माणगाव : येथील उपजिल्हा रुग्णालय शेवटची घटका मोजत असून रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.गौतम देसाई हे सर्व पातळीवर एकाकी झुंज देत असल्याने रुग्णांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. वेळेवर वैद्यकीय उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो.माणगाव मुंबई-गोवा महामार्गावरील जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी गरीब रुग्णांना व अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत माणगावचे पहिले आमदार द. मा. तळेगावकर यांनी संघर्ष करून पेण येथे होणारे रुग्णालय माणगावला आणले. रुग्णालयाचा वाढता पसारा लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी इमारतीचे नूतनीकरण करून त्यामध्ये विविध विभागांची निर्मिती करीत आवश्यक पदे निर्माण केली. उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. माणगावसारख्या महत्त्वाच्या व सोयीस्कर असलेल्या या रु ग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी हजर झाल्यास अनेकांना दिलासा मिळू शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयामध्ये डॉ.गौतम देसाई वगळता एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने रु ग्णालयाचीच हालत खराब झाली आहे. माणगाव शहरात सुमारे ३० ते ३५ खाजगी दवाखाने आहेत. सरकारी रुग्णालयात डॉक्टर नसल्याने तेथे रुग्णांची खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या खाजगी रुग्णालयात खेड, पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, दापोली व इतर शहरातील रुग्ण दररोज उपचाराकरिता दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णालयासाठी कोणत्याही सोयी-सुविधा व उपाययोजना न केल्याने रुग्णांना नाइलाजाने वारेमाप खर्च करून खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागत आहे. आ.सुनील तटकरे हे पालकमंत्री असताना माजी आमदार अशोक साबळे यांच्यासमवेत मंत्रालय मुंबई येथील आरोग्य मंत्र्यांच्या दालनात अनेक वेळा बैठका झाल्या, मात्र तरीही डॉक्टर अद्यापही हजर झालेले नाहीत. तांत्रिक साहित्य व उपकरणे तशीच कर्मचाऱ्यांविना धूळ खात पडली आहेत. लाखो रुपयांचे सिटीस्कॅन मशीन व इतर तांत्रिक उपकरणे कर्मचारी नसल्याने बंद अवस्थेत आहे.