शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बेलापूर रोडवरील अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरण मार्गी

By admin | Updated: July 9, 2016 03:37 IST

दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम

नवी मुंबई : दिघा येथे अतिक्रमणामुळे आठ वर्षे ठाणे-बेलापूर रोडचे रूंदीकरण रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत अतिक्रमण हटवून काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. दोन मार्गिका वाहतुकीसाठी तत्काळ खुल्या करण्यात आल्या असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. सायन - पनवेल महामार्गानंतर नवी मुंबईमध्ये सर्वाधिक वाहतूक ठाणे- बेलापूर रोडवरून होते. ठाणे व मनपा क्षेत्रातील औद्योगिक वसाहती व जवळील जेएनपीटी बंदर यामुळे या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रोडवर प्रत्येक वर्षी खड्डे पडत असल्याने पालिकेने या रोडचे काँक्रीटीकरण केले आहे. तुर्भे एस. के. व्हील ते ठाणे मनपाच्या हद्दीपर्यंत रोडचे रूंदीकरण केले. परंतु दिघा गावाजवळ रोडवर असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे तब्बल आठ वर्षे रूंदीकरणाचे काम रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिघा विभाग कार्यालयाचा पाहणी दौरा करताना त्यांच्या हा प्रश्न निदर्शनास आला. अतिक्रमण आठ दिवसांमध्ये हटविण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला. या भूमिकेमुळे बांधकामधारकांनी स्वत:च अतिक्रमण जमीनदोस्त केले. ८ वर्षांपासून रखडलेला प्रश्न चक्क ८ दिवसांमध्ये सुटला. अतिक्रमण हटविल्यानंतर तत्काळ रूंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. युद्धपातळीवर काम करून या मार्गावरील दोन लेन ३ जुलैला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. उर्वरित लेनचे कामही प्रगतिपथावर आहे. आयुक्तांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे व टाईम बाँडमध्ये कामे करण्याच्या धोरणामुळे वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न तत्काळ मार्गी लागला आहे. येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. अपघात होवून अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. आता या सर्व समस्या सुटणार आहेत. येथील वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहतूकदार ऐरोली - मुलुंड मार्गाचा अवलंब करत होते. यामुळे ७ ते ८ किलोमीटरचा प्रवास वाढत होता. याशिवाय टोलसाठी ६० ते ७० रूपये खर्च होत होता. आता हा खर्च वाचणार असल्याने वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. शहरवासीयांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)