शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

स्टील मार्केटमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:43 IST

उर्वरित कामांकरिता निविदा प्रसिद्ध; वर्षभरात होणार मार्केटचा कायापालट

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत स्टील मार्केटचे स्वरूप बदलण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश लोखंड-पोलाद बाजार समितीने केला आहे. पेरी फेरी रोडचे काँक्रीटीकरण झाले आहेच. त्याचबरोबर इतर तीन अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्याकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. वर्षभरात या मार्केटचा पूर्ण कायापालट होईल, असा विश्वास बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर विकसित करण्याबरोबरच शासनाने लोखंड-पोलाद बाजारपेठ वसविण्याची जबाबदारी सिडकोकडे सोपवली; पण सिडकोकडून या ठिकाणी मूलभूत सोयी-सुविधाही पुरवण्यात आल्या नाहीत. मार्केटमधील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. समितीचे चेअरमन गुलाबराव जगताप यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून १०० कोटी रुपयांचा सहा कि.मी. अंतराचा मुख्य रस्ता तयार करून घेतला. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजार समितीच्या आवारात २० व १५ मीटर रुंदीचे १३ कि.मी. अंतराचे रस्ते आहेत. त्यांची अवस्था बिकट झाली होती, त्यापैकी बाजार समितीने तीन कि.मी. अंतराचे रस्त्यांचे सिमेंटीकरण केले आहे. याकरिता २१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बाजार समितीकडे निधीचा तुटवडा असल्याने चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास रसाळ यांनी सिडको आणि एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांच्याकडून निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी अंतर्गत नियोजन करून हे काम केले. त्याचबरोबर पावणेतीन कि.मी. अंतराच्या रस्त्यांकरिता २० कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच प्रक्रि या पूर्ण करून काम सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित रस्त्यांकरिता ५० कोटी रुपयांची गरज आहे. त्याकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.सिडकोने रस्ते कधी केलेच नाहीत, त्यामुळे अंतर्गत परिस्थिती बिकट झाली. बाजार समितीने काही रस्ते तयार केले. त्याचबरोबर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. एक वर्षाचा कालावधी असला तरी काम जलद व्हावे, यासाठी चार ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहेत.- विकास रसाळ,मुख्य कार्यकारी अधिकारी,स्टील मार्केट कमिटी

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई