शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ -कळंब रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात; विजय हजारे यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 23:58 IST

३५० मीटर रस्त्याचे होणार काम

नेरळ : माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग १०९ वरील नेरळ-कळंब रस्त्याच्या दुरवस्थेविरुद्ध ११ नोव्हेंबरपासून उपोषण करण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी घेतला होता. २०१८मध्ये मंजूर असलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण केले नसल्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या व प्रत्यक्ष कामास सुरुवातही केली. त्याचप्रमाणे यासंदर्भात त्यांना लेखी पत्र दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्ता कळंब पोही येथे कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. त्या रस्त्याचे डांबरीकरण आणि ३५० मीटर भागात सिमेंट काँक्रिटीकरण हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले होते. डिसेंबर २०१८मध्ये या कामाचे कार्यादेश अलिबाग येथील मे. सिद्धिविनायक कंपनीला देण्यात आले होते. निर्धारित मुदतीत ठेकेदाराने रस्त्याचे काम पूर्ण केले मात्र सिमेंटचा रस्ता बनविला नाही.

मध्य रेल्वेच्या नेरळ पाडा फाटकपासून साई मंदिर हा ३५० मीटर लांबीचा रस्ता काँक्रिटचा बनविला जाणार होता. साडेपाच मीटर लांबीचा रस्ता सिमेंटचा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यादेश दिले होते. मात्र, आजतागायत या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम मे. सिद्धिविनायक कंपनीकडून करण्यात आले नाही. त्यामुळे या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री यांना सरकारी पोर्टलवरून केली होती. जुलै २०२०मध्ये तशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी केली होती आणि त्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत कोणताही खुलासा केला नव्हता.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रदीप माळी यांनी साईमंदिर येथे येऊन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांचे पत्र दिले व रस्त्याचे काम सुरू झाले असल्याने आपण आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती विजय हजारे यांना केली. या वेळी राष्ट्रवादीचे कोल्हारेचे अध्यक्ष संजय मोरे, युवासेनेचे रवी पेरणे, सुनील राणे, शिवसेनेचे शाखाप्रमुख नामदेव गोमारे, बरकत अली बाजी, लक्ष्मण चंचे, नरेंद्र तुपे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई