शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:42 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोबरोबरच आता राज्य शासनानेही कंबर कसली आहे

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोबरोबरच आता राज्य शासनानेही कंबर कसली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांनी रविवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देवून कामाची पाहणी केली. तसेच हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय वाढविण्याच्या सूचना सिडकोला दिल्या.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सध्या प्रकल्पपूर्व कामाचा धडाका सुरू आहेत. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या कार्यकाळात विमानतळ प्रकल्पाला प्राप्त झालेली गती कायम राहावी, यादृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. मुख्य सचिव जैन यांच्या विमानतळ प्रकल्प भेटीकडे याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहेत. या भेटी दरम्यान जैन यांनी सुरू असलेल्या प्रकल्पपूर्व कामांचा आढावा घेतला. यात उलवे टेकडीचे सपाटीकरण, भरावाची कामे, नदीचे पात्र बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण करणे आदी कामांचा समावेश होता. विमानतळाच्या उभारणीचे काम मे. एमआयएएलचे मुख्य भागीदार असलेल्या जीव्हीके कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जैन यांनी सिडकोला दिल्या. यावेळी त्यांनी पुनर्वसन आणि पुनर्स्थापना क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांचीही पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीलाही भेट दिली. सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सादरीकरणाद्वारे विमानतळ प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची यावेळी माहिती दिली. या दौऱ्यात सिडकोचे अधिकारी सहभागी झाले होते.