जयंत धुळप, अलिबागसंपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’स रायगड जिल्ह्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत, रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४५ गावांची निवड करण्यात आली असून त्यात एकूण १ हजार ३४२ बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी सप्टेंबर अखेर ३५१ कामे पूर्ण झाली असून १४ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर आतापर्यंत ७ कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.जिल्ह्यात पूर्ण झालेल्या ३५१ बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात अडवण्यात आणि जमिनीत जिरवण्यात यश आले आहे. या जलयुक्त बंधाऱ्यांमुळे त्या आसपासच्या विहिरींच्या जलपातळीत यंदा वाढ दिसून आली तर बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग भातशेतीस झाल्याचे निष्कर्ष कृषी विभागाचे आहेत. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३४२ बंधाऱ्यांच्या कामांसाठी ४२ कोटी ४८ लाख४९ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात २९ कोटी ५४ लाख ८७ हजार रुपये तर जिल्ह्यातील विविध कारखाने व उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मुंबईतील श्रीसिध्दिविनायक न्यासाने रायगड जिल्ह्यास एक कोटी रुपयांचा निधी दिला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण करण्याकरिता आणखी १० कोटी ९३ लाख ६२ हजार रु पये निधीची आवश्यकता आहे.
बंधाऱ्यांची ३५१ कामे पूर्ण
By admin | Updated: October 29, 2015 23:39 IST