शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची आरोग्य व्यवस्था कोमात

By admin | Updated: August 5, 2015 00:18 IST

डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही जादा बेड

नवी मुंबई : डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही जादा बेड टाकण्याची वेळ आली आहे. बहुतांश रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग फुल्ल असून रुग्णांना उपचारांसाठी मुंबईत जावे लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी आरोग्यव्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनावर १५० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करत आहे. परंतु तरीही आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. नेरूळ व तुर्भेमधील माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. ऐरोलीतील रुग्णालय नावापुरतेच आहे. कोपरखैरणेमधील रुग्णालयाची वास्तूही धोकादायक झाली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांपेक्षा जास्त असून पालिकेचे एकमेव प्रथम संदर्भ रुग्णालय शिल्लक आहे. तिथे फक्त ३०० बेड आहेत. शहरात डेंग्यू, मलेरिया व तापाची साथ पसरली आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रोज १५०० ते १८०० रुग्ण येत आहेत. रुग्णालयामधील अतिदक्षता विभाग, ट्रॉमा सेंटर फुल्ल झाले आहे. जागा नसल्यामुळे रुग्णांना परत पाठवावे लागत आहे. सोमवारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सोनोग्राफी व एक्स-रे विभागांत प्रचंड गर्दी झाली होती. अनेक रुग्णांना परत पाठवावे लागले. शहरात जवळपास ६१ रुग्णालये आहेत. अतिदक्षता विभागाची सोय असलेल्या बहुतेक ठिकाणी जागा फुल्ल झाली आहे. ज्या ठिकाणी सुविधा आहे तेथेही रुग्णांना दाखल करण्यापूर्वी २० ते ४० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे. अपघात व इतर आजारांमध्ये ज्यांना अतिदक्षता विभागात ठेवणे आवश्यक आहे, त्यांना सायन, जे. जे. व इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये जागा मिळाली तरी बिल सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णवाहिकाही कमी खर्चात मिळत नाही. गरीब रुग्णांचा जीव जात असताना प्रशासन शांत बसले आहे.नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाखांपेक्षा जास्त झाली असून त्यांच्यासाठी महापालिकेचे वाशीमध्ये ३०० बेडचे एकच रुग्णालय आहे. तुर्भेतील माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. नेरुळचे रुग्णालयही बंदच आहे. ऐरोली रुग्णालय फक्त नावापुरते सुरू असून कोपरखैरणेतील इमारतही धोकादायक बनली असून त्या रुग्णालयाचाही पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. एका रुग्णालयावर ताण पडत असून गरीब रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.