शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिडको अधिकाऱ्याला धमकीप्रकरणी प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 02:04 IST

एप्रिल महिन्यात सिडकोने कामोठे गावात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते.

पनवेल : एप्रिल महिन्यात सिडकोने कामोठे गावात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित सिडको अधिकाºयाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधित अधिकाºयांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सिडकोकडून अहवाल मागवण्यात आला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कामोठे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागात कार्यरत असलेले अधिकारी विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बांधकाम तोडण्यात आले. सिडकोने या जागेवर साडेबारा टक्केच भूखंड वसविले असल्याने सिडकोने संबंधित बांधकाम हटविले. दरम्यान, ही बाब येथील प्रकल्पग्रस्तांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ कामोठेत धाव घेतली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांच्या दालनात सिडको अधिकारी, पोलीस व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह बैठक त्याच दिवशी १७ एप्रिल रोजी पार पडली.कारवाईसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकाºयांना जाब विचारण्यास सुरवात केली. यावेळी त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप संबंधित अधिकाºयांनी केला. याप्रकरणी त्यांनी लेखी पत्रही त्याच दिवशी कामोठे पोलीस ठाण्यात दिले आहे. मात्र, यासंदर्भात कामोठे पोलिसांनी या घटनेचा तपास करून संबंधितांवर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.कामोठे पोलिसांनी सिडकोकडे यासंदर्भात अहवाल मागविला असून तसा पत्रव्यवहारही झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी. एम. देशमुख यांनी दिली.सिडको अधिकाºयाला जीवे ठार मारण्याच्या धमकीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. येथील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न जटील आहे. संबंधित ठिकाणी प्रकल्पग्रस्त राहत होते. त्यांचे लग्न कार्य देखील त्याठिकाणी पार पडलेले आहेत. त्या कार्याचे फोटो देखील प्रकल्पग्रस्तांकडे उपलब्ध असून सिडको असे राहते घर कसे काय तोडू शकते? संबंधित अधिकाºयाला अशाप्रकारची कारवाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा आमदार प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी केला असून पोलिसांनी अद्याप संपर्ककेला नसल्याचेही स्पष्ट केले.