शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त हटाव मोहीम तीव्र, भाजपाचे दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:57 IST

पालिका आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित केल्यांनतर भाजपाने आयुक्तांच्या बदलीविरोधात मोहीम तीव्र केली आहे

पनवेल : पालिका आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित केल्यांनतर भाजपाने आयुक्तांच्या बदलीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह सर्व सभापतींनी आपल्या दालनाबाहेर पालिकेत कामकाज न करता भाजपा कार्यालयात कामकाज करणार असल्याचे पत्रक लावले आहे.आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव शासन दरबारी अद्याप पोहोचलाही नसेल, त्यापूर्वीच भाजपाने आयुक्तांच्या बदलीसाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. अविश्वास ठराव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मंजूर केल्यानंतरच आयुक्त शिंदेची बदली होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच पनवेलमधील सत्ताधारी भाजपा आयुक्तांच्या बदलीसाठी जास्तच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. पालिकेतील महापौर, विषय समित्यांचे सभापती, सभागृहनेते यांची दालने दि. २७पासून बंद राहणार असल्याचे या पत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. ही पत्रके पालिकेच्या नव्या इमारतीच्या आवारात लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, महापौर, विषय समितीचे सभापती, नगरसेवक, सभागृह नेते आदींचे सर्वांचे काम भाजपा कार्यालय पनवेल या ठिकाणाहून चालणार आहे. त्यामुळे नागरिकांना काही काम असल्यास पालिकेऐवजी भाजपा कार्यालयाचे खेटे मारावे लागणार आहेत. भाजपाच्या या भूमिकेमुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. मात्र, हा निर्णय घेण्यामागे आयुक्तांनीच आम्हाला भाग पाडले असल्याचे सत्ताधारी भाजपाचे म्हणणे आहे.आयुक्त सुधाकर शिंदे हे पालिकेतील कर्मचाऱ्यांना भाजपाच्या पदाधिकाºयांचे ऐकू नका, अशा सूचना देत आहेत. त्यांचे ऐकून पालिका कर्मचारी आमचे ऐकत नाहीत. असे असेल तर नागरिकांचे प्रश्न कसे काय सुटतील म्हणून आम्ही भाजपा कार्यालयात बसून नागरिकांची दैनंदिन कामे करणार आहोत- परेश ठाकूर,सभागृहनेते,पनवेल, महापालिका