शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

चौथ्या दिवशीही संप सुरूच

By admin | Updated: April 16, 2017 04:42 IST

सिडकोच्या सफाई कामगारांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरूच आहे. १२ एप्रिलपासून आपल्या विविध मागण्यांसाठी सिडकोचे जवळ जवळ १३०० कामगार

पनवेल : सिडकोच्या सफाई कामगारांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरूच आहे. १२ एप्रिलपासून आपल्या विविध मागण्यांसाठी सिडकोचे जवळ जवळ १३०० कामगार संपावर गेले आहेत. कोकण श्रमिक संघाच्या वतीने हा संप कामगारनेते श्याम म्हात्रे यांनी पुकारला आहे. मात्र, सिडको दखल घेत नसल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिडको वसाहतीत साचलेला कचरा कुजण्यास सुरुवात झाल्याने दुर्गंधी पसरली असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. खासगी कंत्राटदाराकडून कचरा उचल्यास आंदोलक कामगार त्याला विरोध करीत असल्याने अनेक ठिकाणी या वादात पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. विशेष म्हणजे, कळंबोलीमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीत ११ कामगारांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान,आंदोलनकर्त्यांना सिडकोने नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने कामागारांचा अंत पाहू नये, असा गर्भित इशारा कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी दिला आहे. भाजपाचे सोमवारी आंदोलनशहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यांवर दुर्गंधी पसरली असून नागरिक हैराण आहेत. त्यातच कामगारांच्या मागण्या सिडकोकडून मान्य करण्यात येत नसल्याने भाजपाने सोमवारी सिडको भवनावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील कचरा सिडको भवनात टाकण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. कळंबोलीत पोलीस बंदोबस्तात कचरा उचललाकामगारांच्या संपामुळे सिडको वसाहतीत कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. शुक्रवारी भाजपा कार्यकर्त्यांनी नवीन पनवेल येथील सोसायट्यांमधील कचरा जमा केला, तर शनिवारी सिडको कार्यालयावर धडक देत प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करा, नागरिकांना वेठीस धरू नका, असा इशारा भाजपाकडून सिडकोला देण्यात आला आहे. कळंबोलीत सिडकोकडून पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने दहा टन कचरा उचलण्यात आला. या वेळी सफाई कामगारांनी विरोध केला. मात्र, पोलिसांनी तो मोडून काढला. सिडकोत काम करणाऱ्या १३०० कंत्राटी कामगारांनी कायमस्वरूपी नोकरी मिळावी. त्याचबरोबर समान काम समान वेतनाची मागणी कित्येक वर्षे लावून धरली आहे. पार्श्वभूमीवर १२ एप्रिलपासून कामगारनेते श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नवीन पनवेलमधील काही सोसायट्यांमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने कचरा उचलण्यात आला. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्तेही माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्यांनी नवीन पनवेल येथीन सिडको कार्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर कचरा टाकला. शनिवारी माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्यासह माजी नगरसेवक नितीन पाटील, अ‍ॅड. मनोज भुजबळ, डॉ. सविता चौतमोल, सुशिला घरत, एकनाथ गायकवाड, राजश्री वावेकर, समीर ठाकूर, प्रकाश बिनेदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सिडकोवर धडक देत त्वरित कचरा उचलण्याची मागणी केली. भाजपा-शेकापमध्ये जुंपलीशुक्र वारी आम्ही नवीन पनवेल येथील काही सोसायट्यांमधील कचरा उचलला. त्या वेळी याच कामाचा ठेका असलेले शेकापचे विजय म्हात्रे यांनी कचरा उचलण्यास विरोध केला. त्यानंतर शेकापने सायंकाळी सिडको कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर पडलेला कचरा घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी विजय म्हात्रे हे ठेकेदार असूनही सोसायट्यांमधील कचरा उचलला पाहिजे, असे उघडपणे सांगत असल्याचा आरोप संतोष शेट्टी यांनी केला. मात्र, संदीप पाटील यांनी या आरोपाचे खंडण केले. म्हात्रे हे काही मुख्य ठेकेदार नाहीत. त्यांच्यासारखे २५ जण आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली आहे, ती दुटप्पी नसल्याचे त्यांनी सांगितले. सफाई कामगारांच्या मागण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल. आज दहा टन कचरा उचलला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.- नंदकिशोर परब, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, सिडको