शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कमांडर्स गेटवेच्या बिल्डरला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:52 IST

घर, बंगलो विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कमांडर्स गेटवे प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने २०० हून अधिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. गृहप्रकल्पासाठी पैसे घेवूनही वेळेत प्रकल्प सुरू न करता ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई : घर, बंगलो विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कमांडर्स गेटवे प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने २०० हून अधिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. गृहप्रकल्पासाठी पैसे घेवूनही वेळेत प्रकल्प सुरू न करता ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.शैलेश दावडा असे पोलिसांनी अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने वालजी गोकुलदास अँड सन्सच्या वतीने पनवेलमधील विहीघर येथे गृहप्रकल्प सुरू असल्याची जाहिरातबाजी केली होती. त्यामध्ये फ्लॅट, बंगलो याशिवाय रोहाऊस खरेदीसाठी ग्राहकांना लक्ष्य केले होते. याकरिता इच्छुक ग्राहकांना कमांडर्स गेटवे नावाने प्रकल्प दाखवून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार अनेकांनी घर, बंगला खरेदीसाठी कमांडर्स गेटवेमध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदारांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश आहे. परंतु २०१४ मध्ये पैसे भरून देखील अद्याप प्रस्तावित जागेवर कसलेही काम सुरू केलेले नव्हते.याप्रकरणी ग्राहकांनी संपर्क साधल्यास त्यांना ठोस उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच नौदलाचे कमांडर मनीष जोशी यांच्या तक्रारीवरून डिसेंबर २०१७ मध्ये खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासासाठी हा गुन्हा गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त राजकुमार चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा दोनकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजू सोनवणे, सहायक निरीक्षक कृष्णा मेखले हे अधिक तपास करत होते.तपासाअंती त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री शैलेश दावडा याला अटक करण्यात आली आहे. दावडा याने २०० हून अधिक ग्राहकांकडून पैसे घेवून तीन कोटीपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Arrestअटक