शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी लवकर या... भावपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन

By वैभव गायकर | Updated: September 1, 2022 18:41 IST

पनेवल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेले दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी नागरिकांचा उत्साह व्दिगुणीत होताना ...

पनेवल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेले दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी नागरिकांचा उत्साह व्दिगुणीत होताना दिसला. महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात संध्याकाळी शेकडो घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.      आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पालिकेने गणोत्सवाची जय्यत तयारी  केली आहे. गणेशभक्तांच्या सोयी सुविधांसाठी  पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग या ७ विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून विसर्जन घाटांवरती संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.महापालिका क्षेत्रात एकुण 61 ठिकाणी भक्तांना गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. यामध्ये खारघर मध्ये 37 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खारघर प्रभागामध्ये 47 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कळंबोली प्रभागामध्ये 9 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येथे 66 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कामोठे प्रभागामध्ये 6 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 26 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. पनवेल प्रभागामध्ये  9 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 61 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.           चारही प्रभागांमध्ये कृत्रिम तलाव ,विद्युत व्यवस्था, मंडप, बॅरिगेटिंग, गणेश मूर्तीची नोंदणी, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, तराफा निर्माल्य कलशाची सोय करण्यात आली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर महापालिकेच्यावतीने अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभाग तसेच पोलिस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.  विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने नागरिकांसाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग प्रणाली विकसित करून दिली आहे. 

टॅग्स :panvelपनवेलGanpati Festivalगणेशोत्सवNavi Mumbaiनवी मुंबईGanesh Mahotsavगणेशोत्सव