शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:46 IST

कोविन ॲपची केली चाचणी : भविष्यात ५० केंद्रांचे नियोजन, प्रतिदिन १०० जणांना लस देण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोना लसीकरणासाठीची रंगीत तालीम शुक्रवारी नवी मुंबईत यशस्वीपणे पार पडली. लसीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे कोविन ॲप व्यवस्थित चालत असल्याचे निदर्शनास आले. आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष प्रक्रियेची पाहणी करून ओळखपत्राची काटेकोर चाचणीबरोबरच हेल्पलाइनविषयी आवश्यक सूचना केल्या.

नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रुग्णालयात प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. केंद्रावर ४ व्हॅक्सिनेशन ऑफिसर व १ व्हॅक्सिनेटर ऑफिसरची नियुक्ती केली होती. लसीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी कोविन ॲप तयार केले आहे. या ॲपवर लसीकरणाची नोंदणी केल्यानंतर, संबंधित व्यक्तीला लसीकरणाचा दिवस, स्थळ व वेळ याविषयी माहिती मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रमाणपत्रही मोबाइलवरच देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲप व्यवस्थित चालते की नाही, याची चाचणी करण्यात आली. नवी मुंबईमध्ये ही चाचणी यशस्वी झाली आहे. प्रत्यक्ष चाचणीच्या वेळी व्हॅक्सिनेशन अधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी शासनाने दिलेल्या ओळखपत्राची बारकाईने पडताळणी करावी, असे सूचित केले. प्रतीक्षा कक्षात सुरक्षित अंतर ठेवून बैठक व्यवस्था करावी. आवश्यकतेनुसार प्रतीक्षा कक्षांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. संदेश फलकावर हेल्पलाइन नंबर देण्यात यावा व लसीकरण झाल्यानंतर सूचनांचे हस्तपत्रकही देण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

नवी मुंबईमध्ये ५० लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक केंद्रांवर प्रतिदिन १०० जणांना लस देण्यात येणार आहे. भविष्यात आवश्यकतेप्रमाणे केंद्रांमध्ये वाढ केली जाणार आहे. शहरात पहिल्या टप्प्यात १७ हजारांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना  लस देण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात पोलिसांसह स्वच्छता कर्मीलसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, स्वच्छता कर्मचारी, कोरोना काळात कार्यरत असणारे इतर कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. त्यापुढील टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक, सहव्याधी असणारे नागरिक यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीकरणासाठीची रंगीत तालीम घेतली आहे. लसीकरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी केली असून, लसीकरणासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे.- अभिजीत बांगर, आयुक्त, महानगरपालिका