शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाचा फटका

By admin | Updated: June 3, 2017 06:31 IST

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच इतर न्यायपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासमवेतच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरु ड : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच इतर न्यायपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासमवेतच दुधाचेही ट्रक अडविल्यामुळे शुक्रवारी मुरु डकरांना दुधाची चणचण भासली. सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरातून वेगवेगळ्या कंपन्यांचे दूध रायगड जिल्ह्यात येत असते; परंतु संपामुळे याचा परिणाम मुरु डसह इतर तालुक्यांनाही सहन करावा लागला. याबाबत काही दुकानदारांकडे चौकशी केली असता सांगली, सातारा, कोल्हापूर व श्रीगोंदा (नगर) येथून येणारे ट्रक त्या भागात थांबल्यामुळे येथे शुक्रवारी दूध पोहचू न शकल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.भाजीपाला - दुधाची आवक घटलीनागोठणे : शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. या बंदमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून मुंबईकडे येणारी भाजीपाला, तसेच दुधाची वाहने येणे दुरापास्त झाल्याने संप असाच चालू राहिला, तर शनिवारपासून भाजी, दुधाची मोठ्या प्रमाणात उणीव भासणार आहे. नागोठण्यात येणाऱ्या स्थानिक भाजी, फळे दुधाची आवक फक्त ५ ते ७ टक्केच आहे. उर्वरित भाजीपाला, फळे, पेण, पनवेल, पुणे आणि नवी मुंबईतील घाऊक बाजारातून येत असल्याने दुसऱ्या दिवशीच त्याची आवक घटली आहे.मोहोपाड्यात भाजीचे दुप्पट दर१मोहोपाडा : शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाला व दुधाची आवक घटल्यामुळे भाजीपाला महागला. २ जून संपाचा दुसरा दिवस असल्याने रसायनी परिसराचा केंद्रबिदू असणाऱ्या मोहोपाडा शहरात भाजीपाल्याची आवक कमी प्रमाणात होती. यामुळे काही भाजीपाल्याची दुकाने बंद होती. मोहोपाडा भाजीबाजारातील भाजीविक्र ी व्यवसाय शुक्र वारी थंडावला होता. इतर दिवसांच्या तुलनेत आज भाजीचे दर तिप्पट, चौपट झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी २० रुपयांनी विकली जाणारी कोथिंबीर जुडी आज बाजारात १५० ते २०० रुपये दराने विकली गेली. तर मिरची १५० किलो, टोमॅटो ७० रुपये किलो, वांगी १०० रुपये किलो असे प्रत्येक भाजीसह पालेभाज्याही महागल्या होत्या. काँटेज, रिसॉर्ट, खाणावळीला बसला फटका२रेवदंडा : शेतकरी संपावर गेल्याने घाटमाथ्यावरील भाजी व फळे बाजारात दाखल न झाल्याने, शुक्रवारी भाजी व फळबाजारात शुकशुकाट होता. अनेक विक्रेते पेण किंवा वाशी मार्केटमधून भाजी व फळे आणतात; पण काही जणांनी संपाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी न जाणे पसंत केलेले दिसत असून, बाजारात भाजी व फळांची आवक थंडावली आहे. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान हा उपवासाचा महिना सुरू असल्याने सर्वच फळांना मागणी आहे. मात्र, बाजारात फळांची आवक घटल्याने भाव कडाडलेले दिसत असून आंबा बाजारही अजून तेजीत आहे. दरम्यान, स्थानिक भाजीपाला मळे सुकल्याने उपलब्ध दिसत नाही. शेतकरी संपावर गेल्याने काँटेज, रिसॉर्ट, खाणावळी यांना फटका बसला आहे. आता कॉटेज, रिसॉर्टवाले यांनी भाज्या कमी उपलब्ध असल्याने कडधान्ये खरेदीकडे मोर्चा वळविला असून, कडधान्ये पर्यटकांची थाळी सजवताना दिसत आहेत.