शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्ड प्ले’मुळे चक्का जाम

By नामदेव मोरे | Updated: January 23, 2025 10:01 IST

Cold Play: ‘कोल्ड प्ले’च्या शेवटच्या दिवशीही सायन-पनवेल महामार्गाबरोबरच नेरूळ, शिरवणे, जुईनगरच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त ठेवला होता.

- नामदेव मोरेनवी मुंबई -  ‘कोल्ड प्ले’च्या शेवटच्या दिवशीही सायन-पनवेल महामार्गाबरोबरच नेरूळ, शिरवणे  जुईनगरच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त ठेवला होता. परंतु, अंतर्गत रस्त्यांवर काहीच व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. १ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अनेकांना एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. 

डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये तीन दिवस कोल्ड प्लेचे आयोजन केले होते. मंगळवारी रात्री १० वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ५० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांचा लोंढा मैदानाबाहेर आला. यामुळे सायन-पनवेल महामार्ग, नेरूळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता, शिरवणे गाव, जुईनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात चक्का जाम झाला होता. 

बेशिस्त वाहनचालकांमुळे त्रासकार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांनी, रिक्षाचालकांनी शिरवणे गावातील अंतर्गत रस्त्यावरून नेरूळ स्टेशन व जुईनगर स्टेशनकडे जाण्यास सुरुवात केली. त्यांच्या मागून खासगी वाहनेही वसाहतीअंतर्गत रस्त्यावर आली. 

यामुळे  अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली. वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत असल्यामुळे कोंडीत भर पडली होती. रात्री कामावरून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार व कारचालकांनाही या कोंडीत अडकून पडावे लागले. शिरवणे गावासह राजीव गांधी उड्डाणपुलावरही वाहतूक ठप्प होती.  

कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी नेरूळ, शिरवणे, जुईनगर व संपूर्ण नवी मुंबईमधील नागरिकांना वेठीस धरले होते. मंगळवारी रात्री १० पासून ते दीड वाजेपर्यंत अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडी होती.  रवींद्र सावंत, प्रवक्ते नवी मुंबई काँग्रेस

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई