शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सहकार सहनिबंधकांचा गृहनिर्माण संस्थेला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 01:36 IST

आकारलेले अतिरिक्त शुल्क अर्जदाराला परत करण्याचे निर्देश सहनिबंधक डॉ. केदार जाधव यांनी संबंधित गृहनिर्माण सोसायटीला दिले.

नवी मुंबई : बिनभोगवटा शुल्काच्या नावाखाली मनमानी पद्धतीने सेवा शुल्क आकारणाऱ्या कोपरखैरणेतील एका गृहनिर्माण संस्थेला सिडकोच्या सहकारी सहनिबंधकांनी दणका दिला आहे. आकारलेले अतिरिक्त शुल्क अर्जदाराला परत करण्याचे निर्देश सहनिबंधक डॉ. केदार जाधव यांनी संबंधित गृहनिर्माण सोसायटीला दिले.कोपरखैरणे सेक्टर १४ येथील न्यू कृष्णा को.आॅप. हौसिंग सोसायटीतील सदस्य अनुज गुप्ता आणि रमा गुप्ता यांनी सोसायटीच्या मनमानी शुल्क आकारणीच्या विरोधात सहकारी सहनिबंधक कार्यालयाकडे दाद मागितली होती. संबंधित गृहनिर्माण संस्थेचे आपण नियमाने सभासद आहोत, तसेच संस्थेची देणी नियमितपणे भरली जातात. असे असतानाही संस्थेने १ फेब्रुवारी, २0१९च्या देयकात कोणतीही पूर्वसूचना न देता वाढ केली. नियमाप्रमाणे सेवा शुल्काच्या केवळ दहा टक्के बिनभोगवटा शुल्क आकारणे बंधनकारक असतानाही अतिरिक्त शुल्काची आकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, संस्थेने चौरस फुटांच्या अधारे सेवा शुल्काची आकारणी केली आहे. अशा प्रकारची आकारणी बेकायदा असल्याचे अनुज आणि रिमा गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. गृहनिर्माण संस्थेने अर्जदाराचे हे सर्व आरोप फेटाळून लावत संस्थेचा कारभार सहकारी संस्था अधिनियमानुसारच सुरू असल्याचा दावा केला आहे, तसेच अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराची भूमिका नेहमीच संस्थेच्या विरोधात राहिली आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक प्राधिकरणांकडे संस्थेच्या विरोधात तक्रारी केल्याचे सोसायटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.