शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये सीएनजी पंपचालक-रिक्षाचालकांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:22 IST

सीएनजी पंपचालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या काही संतप्त रिक्षाचालकांनी पंपावर हल्लाबोल करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली

उरण : येथील सीएनजी पंपचालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या काही संतप्त रिक्षाचालकांनी पंपावर हल्लाबोल करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली, यामुळे सीएनजी चालकाने घेतलेल्या पंप बंद करण्याच्या ताठर भूमिकेनंतर उरणमधील काही संघटनांनी शुक्रवार, २० रोजी तीन तास रिक्षा बंद ठेवून निषेध व्यक्त केला, यामुळे प्रवाशांची बंद दरम्यान गैरसोय झाली.उरण तालुक्यातील हजारो सीएनजी वाहनांसाठी फुंडे येथील एकच खासगी पंप आहे. एकच सीएनजी पंप असलेल्या पंपावर दररोज मोठी रांग असते. मध्येच कधी वीजपुरवठा खंडित होतो, तर कधी सीएनजी गॅसच संपल्याचा प्रकार घडतो. त्यामुळे मात्र तासन्तास रांगेत उभे राहूनही जर वाहनचालकांना सीएनजी गॅस उपलब्ध न झाल्यास वाहनचालक विशेषत: रिक्षाचालक आणि पंपचालकांमध्ये नेहमीच वादाची ठिणगी पडते. हे नित्याचेच झाले आहे. गुरुवार, १९ रोजी असाच काहीसा प्रकार घडला आणि रांगेत तासन्तास उभे राहूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेले काही रिक्षाचालक व पंपचालक कर्मचाºयामध्ये जोरदार जुंपली. बाचाबाची, शिवीगाळीनंतर प्रकरण हातघाईवर आले. त्यामुळे काही रिक्षाचालकांनी पंपचालकाला मारहाण केली. पंपाच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे पंपचालकाने पंपच बंद केला.सीएनजी पंपचालकाच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वच रिक्षाचालकांना बसला. यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनीही पंपचालकाने चालविलेल्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षा बंदचे हत्यार उपसले, त्यामुळे उरण शहर व परिसरातील २५०० रिक्षाचालकांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल उर्फ अण्णा पुरोगामी यांनी दिली. या वेळी त्यांनी सीएनजी पंपचालकाच्या मनमानी कारभाराचाही पाढा वाचला. या प्रकरणी भाजपनेते महेश बालदी यांची रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या बैठकीत पंप चालकाने तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर तीन तास बंद करण्यात आलेली रिक्षा वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहितीही पुरोगामी यांनी दिली.सीएनजी पंप डिलर गौतम कुटे यांनीही काही अज्ञात रिक्षाचालकांनी नाहक मारहाण करून पंपाची नासधूस केली असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. सीएनजी पंप आणि रिक्षा वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती उरण वपोनि जगदिश कुलकर्णी यांनी दिली.।दररोज पाच-सहा गाड्यांनी सीएनजी पुरवठा केला जातो. मात्र, उरण परिसरातील दररोजच्या वाहतूककोंडीच्या समस्येमुळे कधी कधी दोन-तीनच गॅसच्या गाड्या उपलब्ध होतात. तर कधी वीजप्रवाह खंडित होतो. या कारणांमुळे वाहनांना सीएनजी उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. मात्र, वाहनचालकांकडून सहकार्याची अपेक्षा असताना चालकांकडून अडचणी समजून घेतल्या जात नाहीत, अशी खंतही पंप कर्मचारी गौतम कुटे यांनी व्यक्त केली.