शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा रानमेव्याला फटका?

By admin | Updated: May 12, 2016 02:17 IST

कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे

दासगाव : कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे. करवंदांसारख्या विविध रानमेव्यांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावागावात डोंगर आणि जमिनी विकण्याकडे ग्रामीण भागात कल वाढल्याने धनदांडग्यांनी हे डोंगर बोडके करण्याचा सपाटा लावला आहे. या वनतोडीमुळे करवंदाची रोपटी नष्ट होत असल्याने भविष्यात या रानमेव्याला चाकरमान्यांनादेखील मुकावे लागणार अशी, स्थिती निर्माण होत आहे. याच रानमेव्यावर उन्हाळ्यात आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. हा रानमेवा आता डोंगरावर मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे.कोकणात मे महिन्यात सुटीच्या कालावधीत नोकरी-धंद्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेला चाकरमानी आपल्या गावात येतो. सुटीच्या काळात लहानापासून मोठ्यापर्यंत सारेच जण गावातील आंबे, रानातील करवंदे, काजूची बोंडे, आळू, जांभळे अशी विविध रानफळे खाण्यात गुंग होतात. आता रानमेव्याचा मोसम असून, रानात करवंद, जांभळे, आळू पिकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात निर्माण होणारे ढगाळ वातावरण, विविध भागात पडणारा पाऊस यामुळे हा मोसम हातून निघून जातो की काय, असे वाटू लागले आहे. पिकणारी करवंदे आणि जांभळावर पाऊस पडल्यास ही फळे बेचव होऊन जातात तर ताडफळे गळून खाली पडतात. रानमेवा खाण्याकरिता गावात आलेल्या चाकरमान्यांची पावले रानाकडे वळू लागली असतानाच पावसामुळे हा रानमेवा रुसतो की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.महाड तालुक्यात सर्वच भागात करवंदाची झुडपे आहेत. मधूर ही करवंदे कोकण वगळता इतर जिल्ह्यांत तसेच मोठ्या शहरांत मागणी असल्याने येथील आदिवासी ही करवंदे रानात जाऊन काढतात. आदिवासी करवंदे, जांभळे अशी रानफळे विकून चरितार्थ चालवत आहेत.(वार्ताहर)