शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमध्ये ६ डिसेंबरला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:30 IST

धान्य, डाळी, सुकामेवा व भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर तेलबिया व कडधान्यही बाजार समितीमधून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नवी मुंबई : धान्य, डाळी, सुकामेवा व भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर तेलबिया व कडधान्यही बाजार समितीमधून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाच्या या धोरणाविरोधात माथाडी कामगारांनी ६ डिसेंबरला एकदिवसीय लाक्षणिक बंदचे आयोजन केले आहे.राज्यात काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसचे सरकार असताना सुकामेवा, साखर व डाळी नियमनातून मुक्त केल्या होत्या. भाजपा सरकारने भाजीपाला व फळे नियमनातून मुक्त केले. यानंतर तृणधान्य, तेलबिया व कडधान्य नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे. यासाठी ५ आॅक्टोबर २०१७ मध्ये ११ सदस्यांची समिती कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे.या समितीमध्ये व्यापारी व माथाडी कामगारांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणाºया प्रतिनिधींची नियुक्ती केलेली नाही. शासनाने बाजार समितीमधील सर्वच वस्तू टप्प्याटप्प्याने नियमनमुक्त करण्यास सुरवात केली आहे. यामुळे राज्यातील बाजार समितीमध्ये काम करणाºया माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी ६ डिसेंबरला लाक्षणिक बंदचे आयोजन केले आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा, बटाटा, धान्य, मसाला, भाजीपाला व फळ मार्केटमधील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने याविषयी पत्रक काढले आहे. बाजारसमित्यांचे व कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले आहे.