शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

खारघर-तळोजा पूल वाहतुकीस बंद, सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 04:26 IST

खारघर शहर व तळोजा गावाला जोडणारा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने सिडकोने पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

पनवेल : खारघर शहर व तळोजा गावाला जोडणारा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने सिडकोने पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुलाला लागून असलेल्या सिडकोच्या बागेश्री गृहप्रकल्पाच्या उभारणीसाठी सिडको याच धोकादायक पुलाचा वापर करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर सिडकोला जाग आल्याने धोकादायक पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे फलकही या ठिकाणी लावले आहेत.दोन वर्षांपासून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे फलक सिडकोने या ठिकाणी लावले आहेत. मात्र, या सूचनेचे उल्लंघन सिडकोच करीत असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे धोकादायक पुलांच्या वापरामुळे अपघात होत असल्याच्या घटना वारंवार घडत असतानादेखील सिडको याकडे गांभीर्याने पाहत नव्हती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पादचारी पूल कोसळल्याने सहा जणांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर सिडकोने पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे बॅरिकेड्स या ठिकाणी लावले आहेत.या रस्त्यावरून वाहतूक न करता, पापडीचा पाडा या ठिकाणाहून पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी सूचना सिडकोमार्फत करण्यात आली आहे. हा पूल धोकादायक असल्याने नव्याने बांधण्याची गरज आहे.धोकादायक पुलावरून वाहतूक सुरूचधोकादायक पुलावरून वाहतूक न करता पर्यायी मार्ग असलेल्या पापडीचा पाडा या मार्गावरून वाहतूक करण्याच्या सूचना सिडकोकडून करण्यात आल्या आहेत; मात्र तरीदेखील काही वाहनचालक याच पुलावरून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई