शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील प्रमुख स्थळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मोठा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:13 IST

स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. रविवारी स्वच्छता उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख स्थळांची व्यापक प्रमाणात सफाई मोहीम राबविण्यात आली.महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. यावेळी मोहिमेमध्ये ज्वेल आॅफ नवी मंबई, नेरु ळ, छत्रपती शिवाजी चौक व जागृतेश्वर मंदिर, वाशी, सेक्टर २ परिसर, सीबीडी बेलापूर, सानपाडा तलाव, तुर्भे, मुलुंड-ऐरोली उड्डाणपूल, ऐरोली अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान करून उपस्थित नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. लोकमान्य टिळक कॉलेजमधील एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी कोपरखैरणे परिसरात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण व स्वच्छतेसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विभागातील सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता उप निरीक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छाग्रही व नागरिक सहभागी झाले होते.नवी मंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले. तसेच सीबीडी सेक्टर ८ बी येथील संभाजी नगर याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहाभागने स्वच्छता मोहीम राबवून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छता व कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले. या मोहिमेअंतर्गत तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथे महानगरपालिका शाळा क्र मांक १०३ मधील विद्यार्थ्यांमार्फत विभागामध्ये रॅलीचे आयोजन करून प्लास्टीक बंदी, कचरा वर्गीकरण याबाबत संदेश देण्यात आले. तसेच घणसोली येथील मुंब्रादेवी परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छता अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते.स्वच्छतेबाबत जनजागृती‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टीकचा वापर टाळा, ओला व सुका कचरा वेगळा करा, कचरा वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून जनजागृती करण्यातआली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान