शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील ११ विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:06 IST

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे.

कर्जत : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. त्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील ११ विहिरींची स्वच्छता करण्यात आली.कर्जत तालुक्यातील श्री सदस्यांनी माती तसेच दगड आणि झाडाझुडपांनी व्यापून टाकल्याने बंद अवस्थेत असलेल्या विहिरी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्या पूर्णपणे बंद असलेल्या विहिरी पुन्हा जिवंत करण्याचा उपक्र म डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जलसंवर्धनअंतर्गत हाती घेतला आहे. कर्जत तालुक्यातील पोशीर आणि कळंब ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या ११ विहिरी स्वच्छ करण्यात आल्या. एकावेळी सर्व ठिकाणी श्रीसदस्य विहिरीमध्ये उतरले होते. त्यातील काही विहिरींकडे अनेक वर्षांपासून कोणीही फिरकले नसल्याने त्या मोडकळीस येण्याच्या स्थितीत आहेत. अशा विहिरीमधील जिवंत नैसर्गिक झऱ्यांना वाट करून देताना विहिरीचे तुटलेले दगड व्यवस्थित लावण्याचे काम श्रीसदस्यांनी के ले. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धर्माधिकारी यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जलसंवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमधील बोरीचीवाडी, बाटलीची वाडी, मिरचुलवाडी तसेच पाटगाव याप्रमाणे पोशीर ग्रामपंचायतीमधील देवपाडा, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी येथील विहिरींची स्वच्छता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली. एकावेळी ५०० श्रीसदस्यांनी विहिरीचा तळ पूर्वी कुठे होता, तेथपर्यंत साचून राहिलेला गाळ तसेच माती, प्लास्टिक, बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या विहिरीमध्ये उगवलेली झाडे - झुडपे आणि सुकलेले गवत काढून टाकले. त्यासाठी तरुण श्रीसदस्य विहिरीमध्ये दोराच्या सहाय्याने उतरत होते. साधारण ८० हजार किलो कचरा विहिरींमधून बाहेर काढण्यात आला असून त्यात सर्व प्रकारचा कचरा होता.तो सर्व कचरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छ केलेल्या विहिरीच्या परिसरातून काढून ट्रॅक्टरमध्ये भरून दूर टाकण्यात आला.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या नवीन जलसंवर्धन उपक्र मामुळे बंद असलेल्या अनेक विहिरींना नवसंजीवनी मिळणार असून स्वच्छ केलेल्या विहिरीमध्ये पाणीसाठा पिण्यासाठी वापर व्हावा हा उद्देश असल्याचे श्रीसदस्यांनी सांगितले. (वार्ताहर)